पुणे विभाग – 4 लाख 34 हजार 938 कोरोना बाधित रुग्ण बरे ; विभागात कोरोना बाधित 4 लाख 84 हजार 927 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.18 – पुणे विभागातील 4 लाख 34 हजार 938 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 84 हजार 927 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 773 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 216 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 89. 69 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 13 हजार 645 रुग्णांपैकी 2 लाख 84 हजार 907 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 21 हजार 431 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 307 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 90.84 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 233 रुग्णांपैकी 36 हजार 397 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 414 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 422 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 38 हजार 27 रुग्णांपैकी 32 हजार 209 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 493 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 42 हजार 732 रुग्णांपैकी 38 हजार 116 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 48 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 568 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 290 रुग्णांपैकी 43 हजार 309 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 387 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 594 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 674 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 946 , सातारा जिल्ह्यात 264, सोलापूर जिल्ह्यात 125, सांगली जिल्ह्यात 260 तर कोल्हापूर जिल्ह्यात 79 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 4 हजार 372 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 2 हजार 232, सातारा जिल्हयामध्ये 698, सोलापूर जिल्हयामध्ये 320, सांगली जिल्हयामध्ये 678 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 444 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 22 लाख 8 हजार 375 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 84 हजार 927 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 17 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )


Leave a Reply

%d bloggers like this: