स्त्री अत्याचार व गुन्हेगारीचा ‘भाजप राज्यातच्’ ऊच्चांक…! काॅंग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा आरोप


पुणे दि १७ – “हाथरस अत्याचार पिडीतेस” श्रध्दांजली कार्यक्रम ‘पुणे शहर काॅंग्रेस’ शिवाजी नगर मतदार संघ, प्रभाग क्र १४ वतीने दिप बंगला चौक येथे आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी बोलतांना काॅंग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी देशांत महीला अत्याचार व गुन्हेगारीचे सर्वाधीक ऊच्चांकी प्रमाण भाजप शासीत राज्यांमध्ये होत असून, गुन्हेगाराची मानसिकता व बेपर्वा-वृत्ती ऊंचावण्यास भाजप नेते मंडळी जबाबदार ठरत असल्याचे देखील वारंवार सिध्द झाले आहे.. २०१४ च्या निर्भया प्रकरणी पिडीतेस ‘तत्कालीन युपीए सरकारने’ खास विमानाने परदेशात नेऊन देखील उपचार करून सत्ताधार्यांच्या संवेदनशीलता दाखवली होती, परंतू या बरोबर ऊलट युपी सरकार वागले व केंद्र सरकार तर ब्र शब्द काढण्यास तयार नसल्याचे सांगितले.. या प्रसंगी एनएसयुआय प्रदेश अध्यक्ष मा अमिर शेख, खडकी कॅन्टो. नगरसेविका पूजा आनंद, सौ अडसूळ इ ची भाषणे झाली… सुत्रसंचालन श्री फैयाज शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संतोष देसाई यांनी केले.. कार्यक्रमाचे आयोजक श्री संजय विठ्ठल मोरे, अजीत जाघव, संजय खडसे, भारत पवार व सहकारी यांनी केले.
या प्रसंगी सर्वश्री शिवाजी नगर ब्लाॅक अध्यक्ष श्री अजीज सैयद, एनएसयूआय चे भूषण रानभरे, पीएमटी मा अध्यक्ष शेखर कपोते,जावेद निलगर, संदीप मोरे, सोशल मिडीया चे गुलाम हुसेन खान, सुभाष जेधे, रोहीत बहीरट, बाबा सैयद, आशिश गुंजाळ इ कार्यकर्ते महीला मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.. पुणे शहर काॅंग्रेस कमिटीच्या प्रभाग क्र १४ चे अध्यक्ष सागर कमलापुरकर, राहुल वंजारी, गणेश खेंगरे, संतोष तोंडे, महेंद्र पवार इ नी संयोजन केले..

Leave a Reply

%d bloggers like this: