‘नवनिर्माण-दुर्गा पुरस्कार २०२०’: सामान्यांतील असामान्य स्त्रीशक्तीचा शोध सुरू

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , वडगाव शेरी ’चा उपक्रम

पुणे, दि. 7 – देवीची अनेक रूपं आहेत. कधी ती दुर्गेच्या रूपात असते, कधी ती महिषासुरमर्दिनी असते. कधी ती चंडिका असते तर कधी वरददायिनी असते. आजच्या काळातली स्त्री ही देवीच्या अशाच अनेक रूपांना आपल्यामध्ये बाणवत आयुष्यातल्या आव्हानांना सामोरी जात असते. यशस्वी होत असते. येत्या नवरात्रात ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , वडगाव शेरी ’ आजच्या स्त्रीमधल्या देवींच्या अशाच विविध रूपांचे दर्शन ‘शोध नवदुर्गा’चा या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला घडविणार आहे. यासाठी आजवर समाजापुढे न आलेल्या अशा दुर्गाची माहिती कळविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे .
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ‘‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , वडगाव शेरी ’’तर्फे यंदा ओळख करून दिली जाणार आहे ती तुमच्या आमच्यातील दुर्गाची. आपल्या अवतीभवती आपल्याला अनेक दुर्गा दिसतात. त्यातल्या कोणी स्वत:वरील किंवा इतरांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे, कोणी स्वाभिमानी बाण्याने सामाजिक अत्याचारांविरोधात लढत आहे, अबलांना सबला बनवीत आहे तर कुणी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत उच्च पद प्राप्त केलं आहे. तर कोणी कौटुंबिक पाश्र्वभूमी नसतानाही आव्हानांना तोंड देत एखाद्या क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवून उभी आहे. आम्हाला प्रतीक्षा आहे अशा नवदुर्गाची, तुमच्या आमच्यातल्याच अशा स्वाभिमानी स्त्रियांची. अशा दुर्गाची ओळख समाजाला झाली, तर त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल, हा विश्वास असल्यानेच ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , वडगाव शेरी ’ने ‘महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक प्रतिष्ठान , पुणे ’ च्या सहकार्याने हा आगळा उपक्रम हाती घेतला आहे.
या दुर्गा शहरांपासून खेडय़ांपर्यंत कोणत्याही भागांतील आणि कोणत्याही वयोगटातील असू शकतील, कोणत्याही आर्थिक गटातील असू शकतील. कोणत्याही उद्योग-व्यवसायातील असू शकतील, नोकरी करणाऱ्या असू शकतील किंवा सामाजिक कार्यकर्त्यां वा गृहिणीदेखील असू शकतील. त्या समाजाच्या दृष्टीने सामान्य असतील; पण त्यांचे कार्य असामान्य आहे. म्हणूनच ते सर्वासमोर येणे ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , वडगाव शेरी ’ला अगत्याचे वाटते. आपल्याला ओळख असलेल्या अशा ‘दुर्गे’ची माहिती तिच्या छायाचित्रासह आणि आपल्या संपर्क क्रमांकासह ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना , वडगाव शेरी ’कडे पाठवावी. त्यातून नऊ दुर्गाची निवड केली जाणार आहे . हा मजकूर पाठवताना त्या स्त्रीचं कर्तृत्व नेमक्या शब्दांत पाठवल्यास त्यांची छाननी करणे सोपे जाईल. हा मजकुर आमच्याकडे १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचणे आवश्यक असून याची शब्दमर्यादा ३०० ते ५०० असून पाकिटावर किंवा ईमेल करताना सब्जेक्टमध्ये ‘शोध नवदुर्गाचा’ लिहिणे अत्यावश्यक असून आपण ही माहिती कुरिअरद्वारा
स न ५१, प्लॉट नो ७८ , लेन न १० , महाराणा प्रताप चौक , भैरव नगर , धानोरी , विश्रांतवाडी , पुणे- ४११०१५ / mnvswadgaonshri@gmail.com / kuldipmanse@rediff.comया ईमेलद्वारा पाठवू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: