Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENT

येतोय ‘फ्री हिट दणका’

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट सृष्टी हळू हळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा मनोरंजन सृष्टी उभी राहत आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे. 
लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टी फुलत असताना अनेक नवनवीन प्रयोगांसोबतच नवीन विषयावर चित्रपट येताना दिसत आहे. ‘फ्री हिट दणका’ हा सुद्धा एक भन्नाट विषय घेऊन येत आहे असे चित्रपटाच्या टिझर पोस्टरवरून दिसत आहे. या चित्रपटाला सुनिल मगरे हे दिग्दर्शन तर संजय नवगिरे हे या चित्रपटाचे संवाद, पटकथा आणि गीत लेखन करणार आहेत. टिझर पोस्टरवरून चित्रपटाची कथा ही मैत्री प्रेम यांची सांगड घालणारी असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाची घोषणा झाली असली तरी या चित्रपटाच्या कलाकारांची नाव सध्या गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव आणि दिग्दर्शक सुनिल मगरे सांभाळत असून सुधाकर लोखंडे हे या चित्रपटाचे सह निर्माता आहेत. या चित्रपटाचं संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील करणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading