बिहार पोलिसांनी केली अंकिता लोखंडेची चौकशी
बिहार पोलिसांकडून सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी अंकिता लोखंडेची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. बिहार पोलीस काही वेळापूर्वीच अंकिता लोखंडेच्या घरी पोहचले. त्यांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री अंकिता लोखंडेची चौकशी केली. रिया सुशांतला त्रास देत होती’, अशी माहिती सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेदेखील बिहार पोलिसांनी दिल्याचं समजतं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी अंकिता लोखंडचं निवासस्थान सोडलं. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

