fbpx
Saturday, May 11, 2024
ENTERTAINMENT

अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीची नांदेडमध्ये आत्महत्या

नांदेड, दि. २९ – “खुलता खळी खुलेना” फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने नांदेडमध्ये आत्महत्या केली आहे. उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने वयाच्या 32 व्या वर्षी नांदेडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आशुतोषने आत्महत्या का केली, यामागील कारण अस्पष्ट आहे. या घटनेने मयुरी देशमुखच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.


आशुतोषने फेसबुरवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतील व्यक्ती माणूस आत्महत्या का करतो? याबाबत विश्लेषण करताना दिसत होती. मात्र, तरीही आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. आशुतोष गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याने आज (29 जुलै) सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आत्महत्येमागील खरे कारण पोलीस तपासातून उघड होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading