Tuesday, September 1, 2026
NATIONAL

राम मंदिर असणार तीन मजली

नवी दिल्ली, दि. 22 – अयोध्येतील प्रस्तावित भव्य राम मंदिर आता तीन मजली असणार आहे. म्हणजेच पूर्वीपेक्षा नियोजित आता राम मंदिर अधिक भव्य दिव्य असणार आहे. नव्या डिझाईमध्ये मंदिराचा मोठा कळस असणार आहे.

आज तक या वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. राम मंदिराची पहिली डिझाईन 1985-86 मध्ये बनवण्यात आली होती. ही डिझाईन तत्कालीन भाविकांच्या संख्येकडे पाहून बनवली होती. आता भाविकांची संख्या वाढू शकते म्हणून या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले आहेत. नव्या डिझाईमध्ये मंदिराची लांबी रुंदी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मंदिर अधिक भव्य दिव्य होणार आहे.

पूर्वी नियोजित राम मंदिर दोन मजली होते, आता राम मंदिर तीन मजली असणार आहे. ज्यांची ऊंची 161 फूट तर लांबी 360 फूट असणार आहे. तसेच मंदीर 235 फूट रुंद असणार आहे. मंदिरात तीन कळस वाढवण्यात आले आहे. पूर्वी मंदिराची उंची 128 फूट होती आता ती 161 फूट मंदिर असणार आहे. तीन मजली मंदिरात 318 खांब असणार आहे. प्रत्येक मजल्यावर 106 खांब असणार आहेत. राम मंदिर जमीनीपासून 17 फूट उंचीवर असेल. दुसर्‍या मजल्यावर राम दरबार असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading