Sunday, June 21, 2026
Sports

कोरोना नंतरही क्रीडा क्षेत्र भरारी घेईल – अभिनेते प्रवीण तरडे

पुणे, दि. 22 – सर्वसाधारणपणे लोक वाईट भूतकाळ विसरून जातात आणि नव्या जोमाने कार्यरत होतात. कोरोना महामारीचे संकट लवकरच दूर होईल आणि पुन्हा क्रीडा क्षेत्रास झळाळी मिळेल’ असा विश्वास माजी राष्ट्रीय कबड्डीपटू आणि प्रसिद्ध सिनेकलाकार प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.

स्पोर्ट्सइंडीच्या वतीने ‘कोरोनाचा क्रीडा क्षेत्रावर झालेला परिणाम आणि त्यावरील उपाय योजना या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कबड्डीपटू व अभिनेते प्रवीण तरडे, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू निलेश शिंदे, पूजा सहस्त्रबुद्धे आणि राज्याचे क्रीडा व युवक संचालनालयाचे सहसंचालक डॉक्टर जयप्रकाश दुबळे यांनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना प्रवीण

यावेळी बोलताना प्रवीण

तरडे म्हणाले की, कोरोनामुळे आर्थिक मंदी निर्माण झाली असली तरी क्रीडा हे असे क्षेत्र आहे की ज्याचे प्रायोजकांना नेहमीच आकर्षण असते. प्रो कबड्डी लीगसारख्या स्पर्धा पुन्हा सुरू होतील अशी मला खात्री आहे.

प्रो लीग हा कबड्डीचा आत्मा आहे त्यामुळे उशिरा का होईना या स्पर्धा सुरू होतील. मात्र त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती वाढवण्यासाठी खेळाडूंना खूप मेहनत करावी लागणार आहे. प्रेक्षकांशिवाय स्पर्धा होणे अशक्य आहे कारण त्यांच्यामुळेच आम्हाला प्रसिद्धी आणि पर्यायाने चांगला पैसा मिळतो, असे मत कबड्डीपटू निलेश शिंदे यांने व्यक्त केले.

क्रीडा व युवक संचालनालयाचे सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी सांगितले, राज्यामध्ये असलेल्या विविध क्रीडा संकुलाच्या उपयोगाबाबत खेळाडू, संघटक आदी विविध घटकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील क्रीडा शिक्षकांना नवीन बदलांविषयी आणि नियमांबाबत वेबिनारद्वारे अद्यावत माहिती देण्यात आली आहे.

टेबल टेनिसपटू पूजा सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले की, प्रेक्षकांच्या अनुपस्थित आमच्या स्पर्धा होणे अशक्य आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा आणि विरोध या दोन्ही गोष्टी आम्हाला आमचा खेळ उंचावण्यासाठी मदत करत असतात. यंदा आमच्या स्पर्धां कमी होणार आहेत त्यामुळेच मोजक्या स्पर्धांमध्ये आपली कामगिरी कशी उंचावता येईल हे खेळाडूं पुढे मोठे आव्हान असणार आहे.या वेबिनारचे सूत्रसंचालन व मान्यवरांच्या मुलाखती

या वेबिनारचे सूत्रसंचालन व मान्यवरांच्या मुलाखती

डॉ. मिलिंद ढमढेरे यांनी घेतल्या. स्पोर्ट्सइंडीच्या संचालिका सुप्रिया बडवे यांनी स्वागत केले आणि स्पोर्ट्सइंडीचे व्यवस्थापक श्रीपाद जवळेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading