Sunday, June 21, 2026
PUNE

पुण्यात लोकल, डेमू आणि इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी

पुणे, दि. 19 – मुंबईमध्ये अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे. याच धर्तीवर पुणे शहराला जोडणाऱ्या इंटरसिटी, लोकल आणि डेमू सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात खासगी आणि शासकीय कार्यालयांसह विविध कंपन्या सुरू झाल्या आहेत. परंतु, अद्यापही सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध असल्याने घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंतचा करणे आव्हानात्मक ठरत आहे. शहरात आणि लगतच्या गावांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करणे सोयीचे ठरते. तर, नोकरीवर हजर न झाल्यास नोकरी जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील इंटरसिटी, लोणावळा-पुणे, पुणे-दौंड, पुणे-सातारा आदी मार्गांवर डेमू सोडण्यात याव्या, अशी मागणी नियमित अप डाउन करणाऱ्या प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

रेल्वे फेऱ्या सुरू होण्याबाबत निर्णय नाही
नोकरीनिमित्त रेल्वेतून पुणे शहरातून अन्य शहरांत आणि आजुबाजूच्या गावांतून शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. अनेकांना आता रोज नोकरीच्या ठिकाणी हजर राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांना प्रवास करताना अडचणी येत आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबईसाठी गाड्या सुरू केल्या आहेत. तर पुण्यासाठी का नाही? असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केला आहे. मात्र, रेल्वे फेऱ्या सुरू होण्याबाबत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading