Monday, August 31, 2026
PUNE

पुणे विभागातील 28 हजार 989 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 47 हजार 137 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 13 :- पुणे विभागातील 28 हजार 989 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 47 हजार 137 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 16 हजार 619 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 632 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.50टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.24 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 39 हजार 395 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 24 हजार 508 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 806 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 640 व पुणे कॅन्टोंन्मेंट 87, खडकी विभागातील 47, ग्रामीण क्षेत्रातील 853, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 80 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 853, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 119 व पुणे कॅन्टोंन्मेंट 25, खडकी विभागातील 17, ग्रामीण क्षेत्रातील 45, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 22 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 442 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.21 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के इतके आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 240 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 922, सातारा जिल्ह्यात 56, सोलापूर जिल्ह्यात 169, सांगली जिल्ह्यात 15 तर कोल्हापूर जिल्ह्यात 78 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 752 रुग्ण असून 1 हजार 37 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 650आहे. कोरोनाबाधित एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 4 हजार 99 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 276 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 484 आहे. कोरोना बाधित एकूण 339रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 639 रुग्ण असून 318 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 302 आहे. कोरोना बाधित एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 1 हजार 252 कोरोना बाधीत रुग्ण असून 850 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 377 आहे. कोरोना बाधित एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 44 हजार 652 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 40 हजार 282 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 92 हजार 678 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 47 हजार 137 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

( टिप :- दि. 13 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading