Sunday, June 21, 2026
PUNE

शेखर गायकवाड यांना महापालिका आयुक्त पदावरून हटवले

पुणे, दि. 11 – कोरोना साखळी तुटत नसल्याने पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयावरून आरोपांच्या फैरी सुरू असतानाच आता मनपा आयुक्तांची सुट्टी करण्यात आली आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

आयुक्त शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी आता पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची आयुक्तपदी वर्णी लागली आहे. शेखर गायकवाड यांच्याकडे पुन्हा साखर आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे.

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना त्या पदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यांच्याकडे आता पीएमआरडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading