Sunday, June 21, 2026
MAHARASHTRA

पाथरीचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू

परभणी, दि. 11 – पाथरीचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोहन फड यांच्या मुलाचा अपघात झाला. नेमका हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती समजलेली नाही. मात्र, दुचाकीचा पुढील भागाचा अक्षरश: चकानाचूर झाला आहे. यावरुन हा अपघआत किती भयानक असेल, याची कल्पना येत आहे.दरम्यान, हा अपघात कसा झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

भाजपचे माजी आमदार मोहन फड यांचा लहान मुलगा पृथ्वीराज फड हा मुंबईत शिकतो. लॉकडाऊनमुळे मागच्या काही दिवसांपासून तो परभणीत आला होता. आज संध्याकाळी पावणे नऊच्या सुमारास पृथ्वीराज हा त्याची डुकाटी या मोटारसायकलवरून गंगाखेड रस्त्याच्या दिशेने जात असताना उड्डाणपुलावर त्याचा अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेलं. मात्र, उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच फड कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading