कोरोना कहर कायम; राज्यात शनिवारी ८ हजार १३९ नवीन रुग्ण आणि २२३ लोकांचा मृत्यू
पुण्यात ८२७ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ, १६ मृत्यू
मुंबई, दि.११: राज्यात आज ४३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.५५ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ३६ हजार ९८५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ८१३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९९ हजार २०२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ८५ हजार ९९१ नमुन्यांपैकी २ लाख ४६ हजार ६०० नमुने पॉझिटिव्ह (१९.१७ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८० हजार १७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ३७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २२३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१ टक्के एवढा आहे.
राज्यात नोंद झालेले २२३ मृत्यू हे मुंबई मनपा-३९, ठाणे-५, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजापूर मनपा-११, मीरा-भाईंदर मनपा-१३, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-६, मालेगाव मनपा-३,धुळे-१, जळगाव-१७, पुणे-३, पुणे मनपा-२०, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-१, सोलापूर मनपा-६,सातारा-४, कोल्हापूर-२, सांगली-१, औरंगाबाद मनपा-९, जालना-८, लातूर-१, लातूर मनपा-२, नांतेड-१, नांदेड मनपा-१, अमरावती मनपा-२, नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील २ अशी नोंद आहे.
११ जुलै २०२० पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात ८२७ पाॅझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ८०८ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात १६ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
– ४६१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ६४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २६९०४
(डॉ. नायडू हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटल-२५१०९ आणि ससून ९८५)- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९०९२.
– एकूण मृत्यू -८१६.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १६९९६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३५११ आणि ॲंटिजेन किटद्वारे ८८७
