Tuesday, September 1, 2026
NATIONAL

प्रियांका गांधी लखनौला शिफ्ट होणार ?

नवी दिल्ली, दि. 3 – केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने दिल्लीतील लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्याची नोटीस दिल्यानंतर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी नवीन राजकीय हालचाली करण्याच्या विचारात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या आपला मुक्काम लखनौमध्ये हलविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लॉकडाऊनमधील स्थलांतरित मजुरांचा प्रश्न असो की उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था व इतर मुद्दय़ांवरून मुख्यमंत्री आदित्यनाथ व पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न प्रियांका गांधी सातत्याने करत आहेत. त्याच रागातून सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस केंद्र सरकारने त्यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या संधीचा राजकीय लाभ उठविण्याचा विचार काँग्रेसकडून केला जात आहे. प्रियांका गांधी लखनौला शिफ्ट झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे.

उत्तर प्रदेशमधील राजकारणाचा विचार करता प्रियांका गांधी यांचा दिल्ली ते लखनौ हा प्रवास महत्त्वाचा मानला जात आहे. त्या लखनौमधील ‘कौल हाऊस’मध्ये त्या शिफ्ट होतील, अशी अपेक्षा आहे. हा बंगला इंदिरा गांधी यांची मावशी शीला कौल यांचा आहे. शीला कौल केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री देखील होत्या आणि काँग्रेसच्या त्या लोकप्रिय नेत्या होत्या. ‘कौल हाऊस’ च्या दुरुस्तीचे कामही अलीकडेच पूर्ण झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading