‘बार्टी’तर्फे एमपीएससी परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास

कोरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने ‘बार्टी’ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससी इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी ‘बार्टी’च्या http://www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील ‘एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज’ या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंगचे बार्टीचे फेसबुक पेज व यूट्यूब चॅनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात या क्लासेसचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.
Share this:
- Share on X (Opens in new window) X
- Share on Facebook (Opens in new window) Facebook
- Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp
- Share on Telegram (Opens in new window) Telegram
- Share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn
- Share on Pinterest (Opens in new window) Pinterest
- Email a link to a friend (Opens in new window) Email
- Print (Opens in new window) Print
