Sunday, June 21, 2026
NATIONAL

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फॉरवर्ड पोस्टला भेट; अमरनाथचे घेतले दर्शन

जम्मू – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड पोस्टला भेट दिली. राजनाथ सिंह यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे सोबत होते.

कुपवाडा जिल्ह्यातील एलओसी जवळील फॉरवर्ड पोस्टला राजनाथ यांनी भेट दिली. तिथे तैनात असलेल्या जवानांसोबत संवाद साधला. कुठल्याही परिस्थितीत सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या या शूर सैनिकांचा आम्हाला भरपूर अभिमान आहे, असे ट्‌विट राजनाथ सिंह यांनी केले. राजनाथ सिंह यांनी या दौऱ्याचे फोटो आणि सैनिकांसोबत संवाद साधल्याचे व्हिडीओ ट्‌विट केले आहेत.

फॉरवर्ड पोस्टवर जाण्याआधी त्यांनी पवित्र अमरनाथला भेट दिली. तिथे त्यांनी अमरनाथाचे दर्शन घेतले. इथे मंदिर परिसरात ते तासभर होते. राजनाथ सिंह दोन दिवसीय जम्मू-काश्‍मीर आणि लडाख दौऱ्यावर होते. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी जम्मू-काश्‍मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमधील सुरक्षा स्थितींचा आढावा घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading