Tuesday, June 23, 2026
ENTERTAINMENT

उर्दू भाषेतील ‘विठ्ठला…’ गाण्याला नेटकरी भक्तांची पसंती

–    गाण्याच्या या व्हिडिओ मध्ये दिसते माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टिपलेली छायाचित्ररुपी जिवंत ‘वारी’ !

– गायक महेश काळे, गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांचा वेगळा सांगीतिक प्रयोग

शेकडो वर्षांची परंपरा असलेली आषाढ वारी सहिष्णूतेचा संदेश देते. दरवर्षी लाखो वारकरी आषाढी एकादशीला श्री पांडुरंगाच्या चरणी लीन होत असतात. यंदा कोरोनामुळे वारी होऊ शकली नाही. वैष्णवांच्या मनातील विठुमाऊली बद्दलच्या भावना एका वेगळ्या अंदाजात आणि वारकरी व सूफी संप्रदायाच्या मिलाफातून मांडण्याचा एक प्रयोग झाला, त्याला वारकर्‍यांसह सर्वांचीच पसंती मिळत आहे.

‘ये जमीं भी तेरी, आसमाँ भी तेरा.. विठ्ठला..’’ असे आघाडीचे गीतकार वैभव जोशी यांचे उर्दू शब्द, सुप्रसिद्ध गायक महेश काळे यांचा आवाज आणि नरेंद्र भिडे यांचा वेगळा प्रयोग ‘विठ्ठला….’ या गाण्यात बघायला मिळतो. सोशल मीडियावर अवघ्या काही तासात ‘विठ्ठला…’ या गाण्याला एक लाखाहून अधिक व्हयूव्ज मिळाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकर्‍यांची यंदाची आषाढी वारी झाली नाही, तरी वारीची भक्तांच्या मनात भासणारी उणीव ‘विठ्ठला…’ गाण्याने भरून काढली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. डॉन स्टुडिओची निर्मिती असलेल्या या गाण्याच्या व्हिडीओ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नजरेतील  ‘एरियल’ फोटोग्राफीच्या रूपातील जीवंत वारी दिसते. सोबतच संदेश भंडारे आणि योगेश पुराणिक यांनी काढलेल्या छायाचित्रातून वारीचे दर्शन दृश्य रुपात घडत असल्याने या गीताला आगळा – वेगळा ‘व्हर्च्युअल’  स्पर्श मिळाला आहे. या गाण्याचे ध्वनीमिश्रण तुषार पंडित यांनी केले असून लीड मीडियाचे विनोद सातव या गाण्याचे प्रेझेंटर आहेत.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading