बापूसाहेब भोसले यांच्या वाढदिवसा निमित्ताने शहिदांना अभिवादन आणि चीनचा निषेध
पुणे, दि 28 – राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्तीचे भारताचे राजदूत बापूसाहेब भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात हल्ल्यात भारतीय शहीद वीर जवान सैनिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच धोकेबाज चीनचा निषेध करत चीनचा झेंडा व जी पिंग चा फोटो जोडे मारून जाळण्यात करण्यात आला.

यावेळी धोकेबाज चीन मुर्दाबाद … भारत माता की जय अश्या घोषणा देण्यात आल्या. तसेच देशातील कोरोना संकटात गोरगरीब जनतेचे तीन महिन्याचे मोफत रेशन कीटचे वाटप करण्यात आले. पोलिस, रुग्णसेवा करणारे कोरोना योद्ध्यांना मास्क वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रम राष्ट्रीय अध्यक्ष
बापूसाहेब भसले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संघटनेचे संघराज गायकवाड, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शाहरुख पठाण, युवा आघाडी पुणेचे महादेव गायकवाड, डॉ. जयश्री तोडकर ॲड. दिप्ती काळे, सर्वाधिकार पत्रकार संघाच्या अध्यक्षा कांचन बडवणे, आप्पा ढगे, वंदना दरपेली, द्रौपदी पाटील, परवेज शेख , अनिल कांबळे आणि कार्यक्रमाचे आयोजक तसेच प्रदेश कार्याध्यक्ष इलियास शेख आदी उपस्थित होते.
