Monday, June 22, 2026
NATIONAL

कोरोनावरील पहिले आयुर्वेदिक औषध तयार पतंजलीचा दावा

नवी दिल्ली, दि. 23 – जगभरातील अनेक कंपन्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील लस शोधत आहेत. त्यासाठी अनेक देशांमध्ये संशोधनही सुरू आहे. याच पृष्ठभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केला आहे. आज पतंजलीचे कोरोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध जगासमोर आले आहे.

गिलॉय आणि अश्वगंधाच्या मदतीने कोरोनावर खात्रीने उपचार होऊ शकतो, असे रामदेव बाबांनी म्हटले आहे. कोरोना विषाणू शरीरात शिरताच तो आतील यंत्रणेला त्रास देतो. विषाणूचा गुणाकार होतो आणि तो जास्तीत जास्त पेशींना संक्रमित करतो. ही साखळी तोडण्याचे काम गिलॉय वनौषधी १०० टक्के करू शकते, असे रामदेव बाबा म्हणाले आहेत.

कोरोनाग्रस्तांना गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. गिलॉय आणि अश्वगंधा देण्यात आलेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १०० टक्के आहे. तर मृत्यूदर शून्य टक्के आहे. जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेद केवळ कोरोना रुग्णांवर उपचार करत नाही, तर तो विषाणूच्या मुळावरच घाव घालतो, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले आहे. आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीने कोरोनावरील औषध तयार करण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही, तर या औषधाने 1 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचा दावाही केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हे औषध देण्यात आले. यांपैकी ८० टक्के लोक ठणठणीत झाले आहेत, असेही बालकृष्ण म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading