Sunday, June 21, 2026
ENTERTAINMENT

मराठमोळ्या पृथ्विक प्रतापची शाहरुख खानच्या चित्रपटातून होणार बॉलिवूड मध्ये एन्ट्री

बॉलिवूड मध्ये अमोल पालेकर, नाना पाटेकर आणि अलिकडे रितेश देशमुख, श्रेयस तळपदे या मराठी अभिनेत्यांनी स्वत:चा मराठमोळा अमीट असा ठसा उमटविला आहे. याच मांदियाळीत आता एक नवीन नाव जोडलं जाणार आहे, पृथ्विक प्रताप याचं. थेट बॉलिवूड किंग शाहरुख खानची निर्मिती असलेल्या ‘क्लास ऑफ 83’ या चित्रपटात पृथ्विक महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रेड चिलीज एन्टरटेन्मेन्ट प्रॉडक्शन, अतुल सभरवाल दिग्दर्शित, शाहरुख खान, गौरी खान, गौरव वर्मा यांच्या ‘क्लास ऑफ 83’ या चित्रपटात पृथ्विक प्रताप महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पृथ्विक व्यतिरिक्त या चित्रपटात बॉबी देओल, अनूप सोनी, भूपेंद्र जाडावत, निनाद महाजनी आणि समीर परांजपे यांच्या देखील भूमिका आहेत. या चित्रपटात पृथ्विकची अत्यंत महत्वाची आणि दमदार भूमिका आहे असे म्हटले जाते.

अभिनयाची लहानपणापासूनच पृथ्विकला आवड होती. अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांध्ये त्याने महत्वाच्या भूमिका केलेल्या आहेत. ‘आंबट-गोड’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘हम बने तुम बने’ या सारख्या गाजलेल्या मालिकेंमधून तो लोकांच्या घरोघरी पोहोचला. विनोदाची अचूक जाण हे पृथ्विकचं बलस्थान. या बलस्थानामुळे सोनी मराठी या वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात तो झळकला. एवढेच नव्हे तर तो विजेता देखील ठरला. ‘नाईट स्कूल’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ सारख्या चित्रपटांमधून देखील तो झळकला. नवीन जमान्यातील मनोरंजानाचे साधन असलेल्या वेबसिरीजमध्ये सुद्धा पृथ्विक चमकला. ‘बॅक बेंचर्स’ ही मराठी तर ‘लाखों में एक-2’ या हिंदी वेबसिरीज मध्ये त्याने काम केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading