Site icon Maharashtra Lokmanch

डीक्की च्या राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेचे दिल्लीत 4 जानेवारीला आयोजन

पुणे : दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ( डिक्की ) आयोजित देशभरातील दलीत तरुणांसाठी राष्ट्रीय युवा परिषदेचे आयोजन 4 जानेवारी रोजी दिल्ली येथे करण्यात आले आहे .या राष्ट्रीय युवा उद्योजक परिषदेचे उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार करणार आहेत .तर या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डीक्की चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे असणार आहेत . दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत विविध कंपन्यांचे उद्योजक तसेच शासनाच्या विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी व तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत .

ही परिषद 4 जानेवारी 2022 रोजी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, 15 जनपथ रोड नवी दिल्ली येथे सकाळी 10:00 ते 06:00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे .सद्यस्थितीमध्ये आमूलाग्र बदलासाठी : एकत्र प्रयत्न करू या संकल्पनेवर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे .असे या परिषदेच्या राष्ट्रीय समन्वयक मैत्रेयी कांबळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. वीरेंद्र कुमार, माननीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, सन्माननीय अतिथी मनोज मित्तल, सीएमडी, IFCI लिमिटेड आणि संजीव सन्याल ,सदस्य प्रधानमंत्री आर्थिक सल्लागार समिती ,B 20 चे शेर्पा चंद्रजीत बॅनर्जी ,युवा 20 चे संयोजक अजय कश्यप आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत . तसेच डीक्की चे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री रविकुमार नारा, संजीव डांगी, राष्ट्रीय उपाध्यक्ष, डीक्की आणि डॉ. राजा नायक, राष्ट्रीय उपाध्यक्ष डीक्की मार्गदर्शन करणार आहेत . परिषदेच्या इतर सत्रांचे अध्यक्ष प्रख्यात व्यक्ती आणि प्रशासकीय अधिकारी असतील ज्यांनी तरुण नवोदितांचे भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (ICCR) अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे हे समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे असतील.

दिवसभर चालणारी ही परिषद सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 35 वर्षाखालील तरुण अनुसूचित जाती ,जमाती चे तरुण आणि नवीन उद्योजक एकच छताखाली एकत्रित येतील .यामध्ये सहभागी युवकांना देशभरतील यसस्वी व नामांकित उद्योजक अर्थतज्ञ व विविध उद्योग विभागातील प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळणार असून त्यांच्याशी संवाद तसेच तरुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे .त्यामुळे परिषदेसाठी महाराष्ट्रातील व पुण्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान दलीत इंडीयन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे महाराष्ट्र अध्यक्ष मुकुंद कमलाकर आणि पुणे विभाग अध्यक्ष राजू साळवे यांनी केले आहे .

Exit mobile version