Site icon Maharashtra Lokmanch

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन


पुणे:शनिपार चौक येथे वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने श.हनुमानाची आरती करून महागाई कमी करण्याचे साकडे घालत अभिनव आंदोलन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनात महागाई ची देवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ‘ कमळाबाई ‘ ची आरती करण्यात आली.
हे आंदोलन खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुशआण्णा काकडे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्री विशाल तांबे,निलेश निकम,नगरसेवक प्रदीप गायकवाड, प्रवक्ते प्रदीप देशमुख,महिला अध्यक्षा .मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर , कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, रुपाली ठोंबरे पाटील आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या ,जनतेचा विचार न करता केवळ आपले निर्णय त्यांच्यावर लादणारे सरकार म्हणून मोदी सरकारचा नावलौकिक आहे. वेग -वेगळे कायदे असतील, नोटबंदी जी.एस.
टी लागू करणे, सरकारी कंपन्या – बँका विकणे,जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवणे असे अनेक निर्णय मोदी सरकारने या देशाला दिले आणि या निर्णयामुळे हा देश होरपळत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरमध्ये तब्बल पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली. एकाच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत पाच टक्क्यांनी झालेली ही वाढ खरोखर अन्यायकारक अशीच आहे .आज जीवनावश्यक वस्तू असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे दर वाढलेले आहेत पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, पी.एन.जी,घरगुती गॅस,व्यवसायिक गॅस, खाद्यतेल अश्या सर्वच वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ होण्यास मोदी सरकारची धोरणे कारणीभूत आहेत.

Exit mobile version