Site icon Maharashtra Lokmanch

भाजपच्या पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आंदोलन

पुणे  :  भाजपला बहुमत देऊनही पाणीप्रश्न, रस्ते आदी मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. विविध टेंडर्समध्ये भाजपच्या नगरसेवकांनी पैसे खाल्ले असून, न झालेल्या कामांचीही बिले काढून पैसे खाल्ले आहेत. त्यामुळे भाजपच्या महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले.

याबाबत शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख विजय देशमुख, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, नाना भानगिरे, विशाल धनवडे, अविनाश साळवे, नगरसेविका संगीता ठोसर, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट, अशोक हरणावळ, सचिन भगत, राजेंद्र बाबर, नंदू येवले, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, भरत कुंभारकर, बाळासाहेब मालुसरे, राजेंद्र धनकुडे, समीर तुपे, उल्हास शेवाळे, राजाभाऊ होले, शंकर हरपळे, तानाजी लोणकर, राजेंद्र शिंदे, वैभव वाघ, किशोर रजपूत, उमेश वाघ, उमेश गालिंदे, गजानन पंडित, संजय डोंगरे, महेश पोकळे, सूरज लोखंडे, प्रवीण डोंगरे, नीलेश गिरमे, राजेश मोरे, चंदन साळुखे, रूपेश पवार, अनिल दामजी,राहुल जेकटे, नितीन शिंदे, सचिन जोगदंड यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

गेल्या पाच वर्षांत पुणेकरांना विविध समस्यांचा सामना करावा लागला आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली असून, खड्डे डबल टेंडर काढूनही बुजले गेले नाहीत. भाजप नगरसेवकांनी न केलेल्या कामांची बिले काढली. त्यामुळे ऑमिनिटी स्पेस, कर्मचारी भरती आणि पदोन्नतीमधील संशयास्पद निर्णय, महापालिका शाळांची दुरवस्था आणि ढासळलेली पटसंख्या, सहा महिन्यांपूर्वी केलेले पदपथ उखडून परत नवीन केल्याची प्रकरणे यांसह आंबिल ओढा खोलीकरण आणि सीमाभिंत, नवे पूल बांधण्यावर उठलेल्या प्रश्नांची चौकशी करावी, कोरोनाकाळात निविदा न काढता केलेल्या वारेमाप खर्चाचे ऑडिट करावे, पाणी टँकर भरणा केंद्रावरील भ्रष्टाचार चौकशी करण्याची मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. गेल्या पाच वर्षांतील सत्ताधारी भाजपच्या संशयास्पद आर्थिक कामांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई केली जावी; अन्यथा शिवसेनेच्या वतीने व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Exit mobile version