Site icon Maharashtra Lokmanch

पुणे महापालिकेत प्रवेशासाठी गेटपास अनिवार्य

पुणे : महापालिकेत भाजप नेते किरिट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिकेची सुरक्षेचे पितळ उघडे पडले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य इमारतीतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या मुख्य इमारतीत टपास शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्तांनी आज दिले आहेत.

तसेच महापालिका आवारात आंदोलन करता येणार नाही, नगरसेवक व माजी नगरसेवक यांना नगर सचिव विभागाने ओळखपत्र द्यावेत अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या प्रत्येक प्रवेश द्वारावर सुरक्षा व्यवस्था असली तरी त्याचा धाक नाही अशी अवस्था आहे. महापालिकेला सुट्टी असतानाही किरिट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर काही सुरक्षारक्षकांवर कारवाई झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण करण्यासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य इमारतीच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक केली जात असताना आज महापालिका आयुक्तांनी आदेश काढले. महापालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याची ओळख पटवून द्यावी लागेल, त्याची नोंदही ठेवली जाणार आहे.

महापालिकेने काढलेले नियम

Exit mobile version