Site icon Maharashtra Lokmanch

आयफाल्कनने व्हिडिओ कॉलिंग कॅमे-यासह स्मार्ट टीव्ही के७२ लॉन्च केला

मुंबई : भारतातील अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक ब्रँड आयफाल्कनने के मालिकेच्या पुढील टप्प्याचा विस्तार केला आहे. या के७२ मालिकेत, नवीन व्हिडिओ कॉलिंग सक्षमतेसह ५५ इंचचे मॉडल आहे, ज्याची किंमत ५१,९९९ आहे. टीव्हीमध्ये एक जादूचा कॅमेरा आहे जो वापरकर्त्यांना गुगल ड्युओ अॅपच्या सहाय्याने त्यांच्या टीव्हीद्वारे व्हिडिओ कॉल करण्यास अनुमती देतो.

के७२ वापरकर्त्यास अनुकूल स्मार्ट इंटरफेस सहज उपलब्ध करुन देतात, जे अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करुन उत्तम अनुभूती देतात. आयफाल्कन के७२ हा देशाचा पहिला टीव्ही असेल जो नवीनतम अँड्रॉइड आवृत्तीचा वापर करणारा असेल. डॉल्बी व्हिजन, डॉल्बी एटीएमओएस, अँड्रॉइड (आर) ११, एआयपीक्यू इंजिन, एचडीएमआय पोर्ट्स, ड्युअल-बँड वायफाय, एमईएमसी आणि इतर अनेक प्रगत वैशिष्ट्ये सर्वात धुंद आणि आनंददायी वापरकर्ता अनुभव देतात. अत्याधुनिकतेत पुढील पाऊल टाकत, या स्मार्ट टीव्हीचा अल्ट्रा-स्लिम बेझल डिस्प्ले शरीराच्या गुणोत्तर प्रमाणावर योग्य स्क्रीन शेअर करतो.

घरातच क्लासिक सिनेमॅटिक अनुभव प्रदान करणारा हा स्मार्ट टीव्ही असंख्य रंग आणि अल्ट्रा-हाय डेफिनिशन रिझोल्यूशनसह ४के व्हिज्युअलचे समर्थन करतो. हा टीव्ही कमी दर्जाच्या प्रतिमांचे ४के व्हिज्युअल्समध्ये परावर्तित करण्यात आणि उत्तमोत्तम करण्यासाठी सुसज्ज आहे. हा टीव्ही अँड्रॉइड (आर) 11 च्या नवीनतम आवृत्तीने ही सज्ज आहे. ऑडिओ आउटपुट, यूएचडी टीव्ही डॉल्बी ऑडिओ आणि बॉक्स स्पीकर्ससह एक बेधुंद आणि भारावून टाकणाऱ्या आवाजाची अनुभूती देतो.

हा आश्चर्यकारक यूएचडी स्मार्ट टीव्ही एचडीआर 10 सह विविध एचडीआर फॉरमॅटला समर्थन देतो, जे सामग्रीचे फ्रेम टू फ्रेम ऑप्टिमाइझेशन घडवून आणते. अत्याधुनिक रंग संपृक्तता आणि विस्तारित रंगाच्या मिलाफातून प्रेक्षकांना लख्ख चमक, तीक्ष्णता आणि विरोधाभासासह रंगांचे चमकदार तपशील अनुभवता येतात. मोशन एजन्सेशन अँड मोशन कॉम्पेन्सेशन (एमईएमसी) सहज दृश्ये मिळविण्यास मदत करते. ज्यामुळे गेमिंग चाहत्यांना त्यांच्या गेमिंग सत्रात लॅग-फ्री आणि ब्लर-फ्री व्हिज्युअलचा आनंद घेता येईल.वेगवान वेब ब्राउझिंग आणि दमदार कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी हा टेलिव्हिजन देखील सुसज्ज आहे. अधिकाधिक ओटीटी आणि गेमिंग प्लॅटफॉर्मला पाठिंबा मिळाल्याने हा टीव्ही वापरकर्त्याला कंटाळा येऊ देत नाही.

Exit mobile version