Site icon Maharashtra Lokmanch

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया सुरू 

संशोधन केंद्रांकडून रिक्त जागांची माहिती मागवली

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची पीएच.डी प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली असून त्या अंतर्गत विद्यापीठाशी संलग्न सर्व शैक्षणिक विभाग व संशोधन केंद्र यांच्याकडून मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडील रिक्त जागेचा तपशील घेण्यात येत आहे.

याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३० जुलै रोजी परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे. संशोधन केंद्रातील मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांकरिता ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेस्थळावर जात http://bcud.unipune.ac.in/root/login.aspx या लिंकवर जात २० ऑगस्ट २०२२ पर्यंत ही माहिती मान्यताप्राप्त पीएचडी मार्गदर्शकांनी भरायची आहे. व त्यानंतर मान्यताप्राप्त संलग्नित संशोधन केंद्रांनी २४ ऑगस्ट पर्यंत ही माहिती भरायची आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया तसेच नियम यांची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

Exit mobile version