Site icon Maharashtra Lokmanch

रसिकांना अनुभवता येणार गायन-बासुरीची जुगलबंदी आणि संतुरवादन

पुणे : गेली १९ वर्षे शिक्षण, सांगीतिक कार्यक्रम आणि कार्यशाळा यांच्या माध्यमातून संगीताचा प्रसार करणाऱ्या प्रेरणा संगीत संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, दिनांक ३० जुलै रोजी गायन – वादनाच्या विशेष मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.

कार्यक्रमात जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन आणि ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य अमर ओक यांच्या बासरीवादनाची जुगलबंदी आणि ज्येष्ठ संतूरवादक पद्मश्री सी आर व्यास यांचे पुत्र आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संतूरवादक पद्मश्री पं. सतीश व्यास यांचे संतूरवादन रसिकांना अनुभवयाला मिळणार आहे. प्रमुख कलाकारांना पं. रामदास पळसुले (तबला), रोहित मुजुमदार (तबला) आणि निरंजन लेले (हार्मोनियम ) हे कलाकार साथसंगत करतील.

Exit mobile version