Site icon Maharashtra Lokmanch

जम्बो कोविड सेंटर मध्ये घोटाळा असेल तर पुरावे द्या; कारवाई करू – उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे: भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर पुन्हा एकदा एक गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.त्यावर अजित पवार म्हणाले.पुण्याच्या जम्बो मध्ये पारदर्शकता ठेवलेली आहे.,यात कुठलाही घोटाळा नाही. यामध्ये चांगले अधिकारी काम करत आहेत,त्यामुळं यात कोणाला शंका असेल तर पुरावे द्यावे जर सिद्ध झालं तर कारवाई करू.
असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.

आज अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुण्यातील येरवडा शास्त्रीनगर वाडिया बंगल्याजवळ इमारतीची स्लॅबची जाळी कोसळून दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.तर या घटनेमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.त्यावर पवार म्हणाले,स्लॅब कोसळून मरण प्रकरण आतापर्यंत आशा आवहालात दोषी वर कारवाई होते त्यानंतर कोर्टात गेल की आपण नाही पाहू शकत पण राज्यसरकार च्या हातात आहे ती कारवाई करतोच,पण कोर्टात गेलं की तिकडे निर्णय होतात म्हणून त्यात कोणाला पाठीशी घातलं जात नाही.

आपल्या भागातील लोक कष्टाची काम करायला तयार होत नाहीत.हे लोक आठच दिवस झाले आले होते.हे काम काही लवकर करायचं अस होत.त्यांनी घेतलं होतं त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.असे अजित पवार म्हणाले.

Exit mobile version