Site icon Maharashtra Lokmanch

महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेतर्फे पूरग्रस्त ड्रायव्हिंग स्कूल मालकांना अर्थसहाय्य

पुणे : महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेतर्फे पूरग्रस्त भागातील ड्रायव्हिंग स्कूल मालकांना अर्थ सहाय्य करण्यात आले.  महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते हे अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.

परीवहन आयुक्त कार्यलयात मुंबई, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हींग स्कुल मालक संघटने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील ड्रायव्हींग स्कुल संचालकांनी सुमारे चार लाख रुपयांचा निधी जमा केला होता.  यामधून चिपळुण, कोल्हापुर, सांगली व कल्याण येथील २० ड्रायव्हिंग स्कूल  संचालकांना प्रत्येकी १०,०००/- रुपये व चिपळूण येथील श्रुतीका मोटार ड्रायव्हींग स्कूल चे संचालक महेश पंडीत यांना मारुती स्वीफ्ट गाडी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाक़णे. यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी उपायुक्त लक्ष्मण दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. अविनाश ढाक़णे यांचा सत्कार  संघनेचे अध्यक्ष  ज्ञानेश्वर वाघुले(ठाणे),कोषाध्यक्ष देवाराम बांडे (कल्याण) यांनी केला. उपायुक्त लक्ष्मण दराडे यांचा सत्कार उपाध्यक्ष महेश शिळीमकर(पुणे) व संघटक अशोक पाटील (राधानगरी,कोल्हापुर) यांनी केला. यावेळी प्रस्तावना  सेक्रेटरी सोपान ढोले (अमरावती) यांनी दिली.

यावेळी बोलताना परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाक़णे यांनी महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हींग स्कुल मालक संघटनेचे काम व पुरग्रस्त संचालकांना केलेली मदत या बद्दल संघटनेची प्रशंसा केली. ड्रायव्हींग स्कूलच्या कॅडेटना कसे ट्रेनींग द्यायचे.ड्रायव्हींग स्कुल संचालकांकडुन परीवहन खात्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. संघटनेत पुरग्रस्त निधी जमवण्या साठी विषेश प्रयत्न केलेले कोषाध्यक्ष देवाराम बांडे सरांचा व स्वत:ची स्विफ्ट गाडी संघटनेसाठी कमी किमतीमध्ये दिली ते महेश शिळीमकर या दोघांचा सत्कार उपायुक्त लक्ष्मण दराडे यांचे हस्ते झाला.

कार्याध्यक्ष उत्तम पाटील (कोल्हापुर) यांनी ड्रायव्हींग स्कूल संचालकांना येणार्‍या अडचणी बद्दल माहीती दिली. उपायुक्त लक्ष्मण दराडे यांनी त्या मागणीचे नोटींग करुन ड्रायव्हिंग स्कूल चालकांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणीची पुर्ण माहीती घेवुन लवकरात लवकर अडचणी दुर करतो असे सांगीतले. त्यासाढी लागणारे आदेश सुध्दा संबधीत विभागाला देतो असे सांगीतले. यावेळी मकसुद खान (गोंदीया),विकास काळे (जालना), अरुण कांबळे (कल्यान),शब्बीर मुल्ला (बत्तीस  शिराळा),धर्मेश सचदे(मुंबई),धम्मशिल बोरकर (यवतमाळ), मधुकर उफाड पाटील (जालना), एकनाथ ढोले (पुणे),चंदन ढाकणे(अहमद नगर),ज्ञानेश्वर कुकडे(शेंगाव),नजीबबुल्लह शेख (मुंबई),सीमा पाटील (पनवेल),जगदीश हीरेमठ (कोल्हापुर),अवीनाश पुदाले (कोल्हापुर) व महाराष्टातील इतर स्कुल संचालक उपस्थित होते. आभार प्रदर्शन कार्यध्यक्ष विजयकुमार दुग्गल (पुणे) यांनी केले.

Exit mobile version