Site icon Maharashtra Lokmanch

१४ वर्षाच्या मुलीवरील बलात्काराच्या निषेधार्थ महिला काँग्रेस कमिटीचे मुक आंदोलन

पुणे: देशात मुलीना कुठेही बाहेर जाताना सुरक्षित जाता येत नाही. बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कोर्टात केस दाखल केलेल्या आहेत परंतु त्यांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत यामुळे महिलांना वेळेवर न्याय मिळत नाही. .अशातच काल पुण्यात एका १४वर्षाच्या मुलीवर जो सामुहिक पाशवी बलात्कार झाला त्या घटनेने पुणे शहर हादरून गेले. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीने पुण्यात मुक आंदोलन करण्यात आले.

हे मुक आंदोलन सारसबागेसमोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले या निदर्शनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेस महिला कमिटीच्या अध्यक्षा  सोनाली मारणे  यांनी केले. या आंदोलनाच्या वेळी माजी महापौर कमल व्यवहारे,काँग्रेस पुणे शहर जिल्हा सरचिटणीस संगीता तिवारी, अनुशा गायकवाद, नीता परदेशी, दीप्ती चोधरी, नलिनी दोरगे यांच्यासह पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाच्या च्या वेळी काँग्रेस कडून बलात्कार केलेल्या नराधामाचा निषेध करण्यात आला.

सोनाली मारणे म्हणाल्या, मुलीना आजकाल सुरक्षित राहता येत नाही.देशात मुली वर खूप बलात्कार होत आहे.महिला व मुली सुरक्षित नाहीत. महिला व मुली नि जगायचे कसे. केंद्र सरकारने नराधामाना अटक केली पाहिजे. काल पुण्यात जी काल घटना घडली ती घटना खूप खळबळजनक आहे.आमची केंद्र व राज्य सरकारला एक विनंती आहे.मुलींना त्यांनी या नराधामा पासून वाचवावे, हे बाप्पा या नराधमांना सूडबुद्धी दे,या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा होऊ दे म्हणून आम्ही आज मुक आंदोलन करत आहोत.

संगीता तिवारी म्हणाल्या,काल पुणे शहरामध्ये 14 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार घडला.ती ती घटना एकदम खळबळ जनक आहे. पुण्यात रोज मुलींवर व महिलांवर बलात्कार होत आहे. हे सगळे सरकारने थांबवले पाहिजे. लवकरात लवकर या नराधमांवर कारवाई केली नाही तर अश्या घटना वाढत जातील. म्हणून आज आम्ही मुक आंदोलन करत आहोत.

Exit mobile version