Site icon Maharashtra Lokmanch

लग्नानंतर सिद्धार्थ – मिताली ‘या’ प्रोजेक्टसाठी आले एकत्र!

लाखो तरुणींच्या हृदयांची धडकन वाढविणारा चॉकलेट बॉय अर्थात गोड गुलाबजाम सिद्धार्थ चांदेकर आणि बोल्ड अँड ब्युटीफुल मिताली मयेकर या मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॉट जोडीनं अलीकडेच लग्न केले आणि कित्येकांचे हार्ट ब्रेक झाले. पण आता त्यांच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘स्टोरीटेल मराठी’ या जगविख्यात ऑडिओबुकने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सिरीजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर प्रथमच एकत्र आले आहेत. ‘ हौस हजबंड'(Haus Husband) असं नाव असलेली हि ओरिजनल धम्माल ऑडिओ सिरीज ‘स्टोरीटेल मराठी’ने तयार करून नवा पायंडा रचला आहे.

रोहित आणि रेवा… आत्ताच लग्न झालेलं, एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेलं एक कपल… एकदम गुटर्रर्रर्रगूं! पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या concepts जरा उलट्यापालट्या आहेत… पण आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंत… सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत… तर अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का? त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब या किश्श्याचं नेमकं काय होतं? त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट म्हणजेच ‘स्टोरीटेल मराठी’ची ‘ हौस हजबंड'(Haus Husband).

‘फिरंग’ सीजन १, २ तसेच ‘तो ती आणि तिचा’ सीजन १, २ या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘स्टोरीटेल मराठी’च्या ओरिजनल रंगतदार रोमॅंटिक ऑडिओबुक सिरीजच्या यशस्वी निर्मितीसोबतच या नव्या माध्यमाशी एकरूप झालेल्या चतुरस्र युवा लेखिका गौरी पटवर्धन यांच्याच लेखनीतून ‘हाऊस हजबंड'(Haus Husband) उतरले आहे. आधीच्या दोन्ही सिरीजप्रमाणेच या सीरिजलाही साहित्यप्रेमी प्रचंड प्रतिसाद देतील असा विश्वास ‘स्टोरीटेल मराठी’ला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे उत्तम अभिनय कौशल्यामुळे सिद्धार्थ मितालीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच आता ते आपल्या आवाजाच्या जादूनेही रसिकांना घायाळ करणार आहेत. 

Exit mobile version