Site icon Maharashtra Lokmanch

पुणेकरांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘आयुष काढा’

झे.व्ही.एम. युनानी कॉलेजची निर्मिती; युनानी काढयाचा ‘ मालेगाव पॅटर्न ‘ पुण्यात

पुणे, दि. १४ – कोरोना नियंत्रणासाठी उचललेल्या उपाययोजनांना साथ देत पुण्यातील झेड. व्ही.एम. युनानी कॉलेजने ‘ आयुष काढा ‘ हा युनानी हर्बल काढा घरी करता येईल अशा पॅकेटमध्ये तयार करून पुणेकरांना उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्र मेडीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटर संचालित हे युनानी महाविद्यालय पुण्यातील एकमेव युनानी महाविद्यालय आहे. शेकडो वर्ष युनानी ग्रंथांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, श्वसन विकार, घशाचे विकार , विषाणू विकार नियंत्रित करण्यासाठी या काढ्याची महती वर्णिली आहे.

महाराष्ट्र मेडीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सेंटरच्या अध्यक्ष आबेदा इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.एका पाकिटातील मिश्रण एक ग्लास पाण्यात उकळवून ते अर्धे झाले की ते प्यायचे आहे.७ दिवस रोज २ वेळा हा काढा प्यायचा आहे.

मालेगाव पॅटर्न पुण्यात

मालेगावमध्ये या काढया चा उपयोग झाल्याने कोरोना साथ तेथे नियंत्रित होण्यात मदत झाली, असे कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. जलिस अहमद यांनी सांगितले.

या काढयामध्ये ९ औषधी वनस्पती आहेत. ताप, थंडी, विषाणू विकारामध्ये बचावासाठी हा काढा उपयोगी पडतो, असे या युनानी महाविद्यालयाच्या विभागप्रमुख एच के नुसरत नफीस यांनी सांगितले. या महाविद्यालयात सकाळी ९ ते १ या वेळात हा काढा नाममात्र , म्हणजे २० रुपये प्रति पाकिट या दरात मिळू शकणार आहे.

Exit mobile version