Site icon Maharashtra Lokmanch

शिंदे गटाची शहर कार्यकारिणी जाहीर

पुणे: राज्यातील सत्ता स्थापनेनंतर शिंदेगट कडून स्थानिक पातळयांवर पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस सुरूवात करण्यात आली आहे. त्या, अंतर्गत शहर प्रमुख आणि सह संपर्क प्रमुखांच्या नियुक्‍त्या करण्यात आल्यानंतर सोमवारी विधानसभा निहाय उपशहर प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पुणे शहर सहसंपर्कप्रमुख अजय भोसले व शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते देण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, या नियुक्‍त्या करण्यात आल्याचे भानगिरे यांनी सांगितले.
असे आहेत उपशहर प्रमुख
विकास अरुण भांबुरे ( पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ ) , सुनील शहाजी जाधव ( (वडगावशेरी मतदारसंघ ), विकी शिवाजी माने ( हडपसर विधानसभा मतदारसंघ) , सुधीर शंकरराव कुरूमकर (पर्वती विधानसभा मतदारसंघ), संजय राम डोंगरे (शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ), सचिन थोरात (कोथरूड विधानसभा मतदारसंघ) निलेश गिरमे (खडकवासला विधानसभा मतदारसंघ)

Exit mobile version