Site icon Maharashtra Lokmanch

बृजभूषण यांना रोखण्यासाठी काय केले हे उघडपणे सांगता येणार नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : आज पुण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होत. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं होत.

राज ठाकरे यांची पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच येथे जाहीर सभा झाली. त्यातच आता राज ठाकरे यांनी सभेत बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी अयोध्या रद्द का केला याच देखील कारण सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले कि, तुमच्यावर केसेस नको म्हणून मी अयोध्या दौरा रद्द केला, मला माझी पोरं हाकनाक जाऊ द्यायची नव्हती, असं ठाकरेंनी सांगितलं आहे. बारा तेरा वर्षानंतर माफी मागण्याची आठवण झाली. हे सगळे आतून एक आहे. अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हायला पाहिजे ही मागणी राज ठाकरे यांनी आज केली. मात्र आम्ही ही मागणी आधीपासूनच करत आहोत. राज ठाकरेना काय वाटते ते त्यांनी सांगितले. आपली भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. पण हा भाजपचा छुपा ट्रॅप आहे हे सांगायला काँग्रेसचे नेते सचिन सावंत एवढे मोठे झाले नाहीत. बृजभूषण यांना थांबवण्यासाठी काय केलं हे उघडपणे सांगता येणार नाही. बृजभूषण यांची भूमिका वैयक्तिक होती.असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Exit mobile version