Site icon Maharashtra Lokmanch

आगामी महानगरपालिक निवडणूका ओबीसी समाजाला बरोबर घेवून व्हाव्यात – महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : ओबीसी समाजाला अजूनही आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका व महानगरपालिकेच्या निवडणुका या सहा महिने पुढे ढकलल्या आहेत. त्या विधेयकावर राज्यपालांनी सही करून प्रस्ताव पुढे पाठवला आहे. तरी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय रखडवाला. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक किमान सहा महिने पुढे ढकलली जाणार आहे. आज पुणे महानगरपालिकेत आमची मुदत संपत आहे. मात्र आगामी महानगर पालिकेची व स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही ओबीसी समाजा बरोबर घेवून व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज व्यक्त केले.

पुणे महापालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ आज संपत असून सत्ताधारी भाजपचा पुणे महानगरपालिकेत आज शेवटचा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी संवाद साधला.

पुढे बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेल्या पाच वर्षात या महानगरपालिकेत खूप सभा झाल्या. खूप प्रकल्प मंजूर झाले. आज होणाऱ्या मुख्य सभेत गेल्या पाच वर्षात आम्ही केलेल्या कामाचा आढावा घेणार आहोत. अजितदादांनी काल तीन महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका या होऊ शकतात, सांगितले असले तरी ओबीसी समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे.

पुणे महापालिकेत उद्यापासून प्रशासकराज   

महापालिका पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस आहे. उद्यापासून महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात जाणार आहे. महापालिका आयुक्त विक्रमकुमार प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.

 

Exit mobile version