Site icon Maharashtra Lokmanch

पुणे महापालिकेची सूत्रे 15 मार्च पासून आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे

पुणे : पुणे महापालिकेची  मुदत येत्या १४ मार्च रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर १५ मार्चला मध्यरात्रीपासून पुणे महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत . मुंबईसह  राज्यातील १० महापालिकांची मुदत संपत असून सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने या सर्व महापालिकांवर त्यांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत, अशी माहिती राज्याच्या सचिव दर्जाच्या अधिकार्‍याने दिली.

पुणे महापालिकेची सूत्रे 15 मार्च पासून आयुक्त विक्रमकुमार हे बघणार आहेत. पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे विद्यमान सदस्यांचा कालावधी जेमतेम दहा दिवसांपर्यंतच राहाणार आहे.
महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची  प्रक्रिया सुरू झाली असली तरी अद्याप अंतिम प्रभाग रचना,
आरक्षण व प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. पुढील दोन महिन्यांमध्ये ही निवडणुक प्रक्रिया होउन नवीन सभागृह अस्तित्वात  येत नाही तोपर्यंत महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या माध्यमातूनच होईल, अशी शक्यता सुरूवातीपासूनच व्यक्त करण्यात येत होती.

Exit mobile version