Site icon Maharashtra Lokmanch

आंबिल ओढा प्रकरणी प्रशासनाने विकसकाची बेकायदेशीर नेमणूक करुन केले जाहीर प्रकटन.. माहिती अधिकारात प्रकार उघड…

पुणे : पुणे मनपा च्या उपयुक्त परिमंडळ क्रं 5 चे सक्षम अधिकारी अविनाश सपकाळ यांनी दिनांक 26 मार्च 2021 रोजी वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीर नोटिसनुसार किशोर कांबळे यांनी दिनांक 18 जून 2021 रोजी माहिती अधिकारात आंबील ओढा विषयात मागवलेल्या माहितीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ने दिलेल्या पत्रानुसार विकासक केदार असोसिटस यांनी आंबील ओढा फायनल प्लॉट 28 सदाशिव पेठ या जमिनीच्या किमतीच्या 25 % प्रीमियम रक्कम भरली आहे असे पत्र मिळाले. त्यांनतर किशोर कांबळे यांनी या 25 % रक्कमच्या चलनाच्या प्रति दिनांक 17 ऑगस्ट 2021रोजी माहिती अधिकारात मागविल्यानंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून 25 % रक्कम भरली नसल्याचे पत्र देण्यात आले, यावरून प्राधिकरण प्रशासन चुकीचे काम करून आंबील ओढा झोपडपट्टी धारकांना फसवत असल्याचे समोर आले आहे. यावरून कोणतेही प्रीमियम रक्कम न भरता, प्रस्ताव मान्य न होता केदार असोसिटस या विकसकाची बेकायदेशीर नेमणूक करून जाहीर प्रकटनात विकसकाचे नाव टाकून प्रशासनाकडून आंबील ओढा जनतेची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.


आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी आणि ओढा सरळीकरण विषय गाजत असताना, पुणे महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे असताना झोपडपट्टी वासीयांसाठी लढणारे बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष किशोर कांबळे हे सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. किशोर कांबळे यांनी आंबील ओढा विषयात सातत्याने पाठपुरावा करून फसव्या प्रशासनाला जनतेसमोर आणल्याने आंबील ओढा रहिवासीयांनी आभार मानले.

Exit mobile version