Site icon Maharashtra Lokmanch

भाजप नेते नितीन गडकरींना भाषणादरम्यान भोवळ

यवतमाळ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भरसभेत भाषणादरम्यान भोवळ आली. नितीन गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यामुळे गडकरी यांचा तोल जाणार होता. तेवढ्यात स्टेजवरील लोकांनी आणि अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. यवतमाळच्या पुसद येथील जाहीर सभेदरम्यान ही घटना घडली आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेदरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भोवळ आली.

यवतमाळमध्ये महायुतीच्या जाहीर सभेत भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. यावेळी उपस्थितांनी त्यांना सावरलं. आज राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी पुसदच्या शिवाजी ग्राऊंडवर महायुतीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेत भाषणाला उभे राहिलेल्या गडकरींना भोवळ आली. यावेळी त्यांच्या अंगरक्षकाने आणि मंचावरील इतर उपस्थितांनी त्यांना सावरलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर गडकरींना उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version