Site icon Maharashtra Lokmanch

चरणजीत कौर ने युगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२१ मध्‍ये २ कांस्‍य पदके जिंकली

पुणे : गौरव खन्‍ना एक्‍सेलिया बॅडमिंटन अकॅडमी लखनौच्‍या चरणजीत कौरने युगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२१ मध्‍ये २ कांस्‍य पदके जिंकली. १५ ते २१ नोव्‍हेंबर दरम्‍यान कम्‍पाला शहरातील एमटीएन एरेना लुगोगो स्‍पोर्टस् कॉम्‍प्‍लेक्‍स येथे युगांडा पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२१ चे आयोजन करण्‍यात आले. हे यश प्राप्‍त करण्‍यापूर्वी चरणजीतने दुबई येथे दुबई पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२१ मध्‍ये कांस्‍य पदक जिंकले. त्‍यानंतर लगेच चरणजीतने केरळ येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या भारताच्‍या पहिल्‍या पॅरा मास्‍टर्स नॅशनल इनडोअर गेम्‍स २०२१ मधील पॅरा बॅडमिंटनमध्‍ये सुवर्ण पदक देखील जिंकले.

पटियाला येथे जन्‍म झालेली चरणजीत विवाहानंतर दिल्‍लीला आली. त्‍यानंतर तिच्‍या कुटुंबाच्‍या पाठिंब्‍यासह लखनौला आली आणि लखनौमधील गौरव खन्‍ना एक्‍सेलिया बॅडमिंटन अकॅडमीमध्‍ये सामील झाली. अकॅडमीमध्‍ये सर्वोत्तम प्रशिक्षण प्राप्त करत तिने तिच्‍या करिअरला सुरूवात केली. चरणजीतला लखनौ येथील या अकॅडमीमध्‍ये पूर्णवेळ सर्वोत्तम प्रशिक्षण मिळत आहे. तसेच अकॅडमी परदेशातील आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांमध्‍ये आपल्‍या देशाचे नावलौकिक करण्‍यासाठी सर्व प्रकारच्‍या प्रतिस्‍पर्धींचा सामना करण्‍याकरिता तिचे धैर्य व क्षमता सुधारत तिला प्रोत्‍साहित देखील करत आहे.

Exit mobile version