Site icon Maharashtra Lokmanch

पदचारीका वरील झोपडपट्यांना पक्क्या घरात पुनर्वसन करा – वैराट

पुणे – शहरातील पदचारीका मार्गावरील झोपड्या वर्षोनुवर्षे असून त्यात कष्टकरी व गोरगरीब राहत असताना त्यांच्या राहणीमान उंचावण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे अंतर्गत शहरी गरीब योजनेतून पक्की घरे मोफत देऊन पुनर्वसन करावे अशी मागणी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते भगवान वैराट यांनी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली.

तसेच पुणे शहरातील विविध प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना बी.एस. यु.पी योजनेअंतर्गत पक्की घरे देऊन कायमचा निवारा देण्याची मागणी करून उड्डाणपुलाखाली झोपडपट्टीवासीयांना देखील त्यांचे पुनर्वसन करावे इत्यादी मागणीसाठी पुणे महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात नुकतीच विविध परिमंडळ अधिकारी व महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरात लवकर झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांचे निर्णयाबाबत संबंधित यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीत मनपा अधिकारी संदीप कदम, अविनाश सपकाळ इत्यादी उपस्थित होते

झोपडपट्टी सुरक्षा दलाचे पदाधिकारी महंमद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, संतोष कदम, संतोष बोताळजी, नाजिया शेख, रेखा चव्हाण, वंदना पवार, महादेव मोरे, सूर्यकांत सपकाळ, सुनील भिसे श्रद्धा दिघे, नीलम सोनवणे, संतोष सोनवणे, महेंद्र लालबिगे, किशोर रोडगे, इम्तियाज शेख, बाबू लोहार, सदाशिव साखरे, दीपक राठोड, विनोद कांबळे, लक्ष्मण बिराजदार, संतोष पिल्ले, परदेशी इत्यादी शिष्टमंडळा शिष्टमंडळातील बैठकीत सहभाग होता ही बैठक अतिशय सामाजिक हित जपणारी बैठक म्हणून महानगरपालिका विशेष आयुक्त श्री सुरेश जगताप यांनी कौतुक करून झोपडी धारकांनी सेवाशुल्क महसूल भरल्याने झोपडीधारकांचा विकास अधिक प्रभावी पद्धतीने करता येईल असा आशावादही केला.

Exit mobile version