Site icon Maharashtra Lokmanch

न्यू पुणे केटरिंग असोसिएशनच्या वतीने अन्न सुरक्षा आणि आरोग्यविषयक जागृती मोहीम    

पुणे, दि. ४ –  न्यू पुणे केटरिंग असोसिएशन च्या वतीने अन्न सुरक्षा आणि आरोग्यविषयक जागृती मोहीम आखण्यात आली आहे .अप्रशिक्षित व्यावसायिक आणि कामगारांना अन्न सुरक्षा ,आरोग्य विषयक प्रशिक्षण देण्यासाठी  फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन (एफ डी ए ) चे सह आयुक्त शिवाजी देसाई यांना  निवेदन देण्यात आले. 

सर्व मंगल कार्यालये,लॉन,क्लब हाऊस येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी केटरिंग असोसिएशन सहकार्य करेल असे असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश माळी यांनी यावेळी सांगितले.मोठ्या प्रमाणावर अन्न तयार होत असलेल्या सर्व किचन ची आरोग्यविषयक तपासणी एफडीए ने केल्यास असोसिएशन सहकार्य करेल तसेच नव्या व्यवसायिकांना अन्न परवाने काढून देण्यास  मार्गदर्शन केले जाईल, असे या शिष्टमंडळाने सांगितले. 

या प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गौड, जे डी शाहजी, जी एस बिंद्रा, सुखदेव सिंग चारण, मनोज वैष्णव, कुणाल परदेशी, दशरथ राजपुरोहित, कालू महाराज, अर्जुन सिंग, विजय मिश्रा, दिलीप राजपुरोहित, प्रताप परमार, समीर ठाकूर, संतोष मकुडे, प्रताप माळी हे उपस्थित होते. 
 

Exit mobile version