मुंबई : प्रोटीयन ई-गव टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा (आधी एनएसडीएल ई गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी कंपनी) आयपीओ ६ नोव्हेंबर २०२३ रोजी खुला होणार आहे. आयपीओच्या एकूण ऑफरमध्ये समभाग विक्री करू इच्छित असलेल्या समभागधारकांकडून ६१९१००० पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश असणार आहे. अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार, ३ नोव्हेंबर २०२३ रोजी बोली लावता येईल. ही ऑफर सोमवार, ६ नोव्हेंबर २०२३ रोजी खुली होईल आणि बुधवार, ८ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद होईल. प्रत्येक इक्विटी समभागासाठी ७५२ ते ७९२ रुपयांदरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी १८ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास १८ च्या पटीत बोली लावता येईल. समभाग विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंडकडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड कंपनी) ४,५९,६१७ पर्यंत इक्विटी शेयर्स, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज २कडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज २) ३,२०,१७७ पर्यंत, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ३ कडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ३) १,४८,१९७ पर्यंत, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ४ कडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ४) ३,९६,८४३ पर्यंत, ३६० वन स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ५कडून (आधीची आयआयएफएल स्पेशल अपॉर्च्युनिटीज फंड – सीरिज ५) ३,०९,२२५ पर्यंत, एनएसई इन्वेस्ट्मेन्ट्स लिमिटेडकडून १७,८३,३९५ पर्यंत, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाच्या स्पेसिफाईड अंडरटेकिंगच्या ऍडमिनिस्ट्रेटरकडून २,४३,१७५ पर्यंत, एचडीएफसी बँक लिमिटेडकडून ७,०५,६७४ पर्यंत, ऍक्सिस बँक लिमिटेडकडून ७,१२,०७७ पर्यंत, ड्यूश बँक ए. जी. कडून ७,१२,०७७ पर्यंत आणि युनियन बँक ऑफ इंडियाकडून ४,००,५४३ पर्यंत इक्विटी समभागांच्या विक्रीचा समावेश आहे. या ऑफरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या १,५०,००० पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे (एम्प्लॉयी रिझर्वेशन पोर्शन). बोली लावण्यासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रपोर्शनेट बेसिसवर वाटून दिले जातील. कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भागामध्ये बोली लावणाऱ्या पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी समभाग ७५ रुपयांची सूट दिली जाईल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असलेले इक्विटी समभाग बीएसईमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. १८ जानेवारी २०२२ रोजीच्या पत्रानुसार आमच्या कंपनीला बीएसईमध्ये इक्विटी समभागांच्या लिस्टिंगसाठी बीएसईकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. या ऑफरसाठी डेसिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज बीएसई असणार आहे. ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, १९५७ च्या नियम १९ (२) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम ३१ नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम ६(१) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी ५०% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी ६०% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी ५% हे प्रपोर्शनेट बेसिसवर म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरचा कमीत कमी १५% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: (अ) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग २,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल (ब) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग १०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी ३५% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. अधिक तपशिलांसाठी पान क्रमांक ३३०वर “ऑफर प्रोसिजर” पहा. या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, इक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि नोमुरा फायनान्शियल अड्वायजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत.
Like this:
Like Loading...
Read More