fbpx
Thursday, April 25, 2024

परेश रावल

ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNE

… तर आणखी अनुभवसंपन्न झालो असतो; परेश रावल

पुणे : मराठी भाषेतील साहित्य, कलाकार, लेखक हे करीत असलेले काम उच्च दर्जाचे आहे, मी जर आज मराठी रंगभूमीत काम

Read More
ENTERTAINMENTLatest News

परेश रावल आणि विजय केंकरे यांच्याबरोबर रंगणार ‘कोण होणार करोडपती’चा विशेष भाग

जनसामान्यांचा  लोकप्रिय  कार्यक्रम म्हणजे ‘कोण होणार करोडपती’. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात’ परेश रावल आणि विजय केंकरे हॉट सीटवर येणार आहेत. ह्युमॅनिटेरिअन एड फाउंडेशन या संस्थेसाठी परेश रावल आणि विजय केंकरे ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. मागील विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती. या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेल. मराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते परेश रावल ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. त्यांच्याबरोबर हॉट सीटवर असणार आहेत मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक आणि अभिनेते विजय केंकरे. नाट्यकर्मी म्हणून असलेली अंगभूत ऊर्जा घेऊन, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिग्दर्शक विजय केंकरे गेली ४० वर्षे रंगभूमीवर कार्यरत आहेत वेगवेगळ्या शैलींतील नाटकं प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणारे विजय केंकरे यांनी नुकतेच मराठी सृष्टीतील आपले शंभरावे नाटक प्रेक्षकांच्या समोर आणले. परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र येऊन ह्युमॅनिटेरिअन फाउंडेशन एड या संस्थेसाठी ‘कोण होणार करोडपती’चा खेळ खेळणार आहेत. या विशेष भागात या दोघांच्या गप्पांची मैफल नक्कीच जमेल. मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी, त्या दोघांचा सिनेसृष्टीतील सुरुवातीचा काळ या सगळ्या विषयांवर या भागात गप्पा रंगल्या. प्रेक्षकांसाठी हा भाग म्हणजे पर्वणीच ठरेल ‘कोण होणार करोडपती’च्या खेळाबरोबरच परेश रावल आणि विजय केंकरे यांचे मनोरंजक अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘कोण होणार करोडपती’ विशेष, १० जून, शनिवारी रात्री ९ वाजता,फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Latest NewsMAHARASHTRA

डेल्फिक कौन्सिलने महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक ठेवा जतन करावा : राज्यपाल

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी डेल्फिक कौन्सिलच्या महाराष्ट्र शाखेच्या बोधचिन्हाचे (लोगो) आज राजभवन येथे अनावरण केले. कौन्सिलच्या माध्यमातून

Read More
ENTERTAINMENTNATIONAL

NSD च्या अध्यक्षपदी अभिनेता परेश रावल

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) अध्यक्षपदी माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे काम आव्हानात्मक पण मजेशीर असेल, असं मत त्यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं. त्यांची ही नियुक्ती पुढील चार वर्षांसाठी असणार आहे.

Read More