fbpx
Tuesday, September 26, 2023

राहुल देशपांडे

Latest NewsPUNE

राहुल देशपांडे यांच्या सादरीकरणातून घडले पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन

पुणे : युगप्रवर्तक, विख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन पुणेकर रसिकांना घडले. निमित्त होते स्वरझंकार व इंडेको प्रायमस यांच्या वतीने ‌‘कुमार रागविलास‘ या सांगीतिक मैफलीचे. पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पंडित कुमार गंधर्व यांनी बांधलेल्या बंदिशींचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी रसिकांशी संवाद साधत केलेले सादरीकरण मैफलीचे वेगळेपण ठरले. राहुल देशपांडे यांनी मैफलीची सुरुवात राग श्रीने केली. ‌‘पावा मय दुरासे‘, ‌‘रिसई काहे‘ आणि ‌‘करन देरे कछुलला‘ या तीन बंदिशींचे सादरीकरण केले. त्यानंतर कल्याण रागातील बंदिशी सादर केल्या. ‌‘बैठी हुं अकेली‘, ‌‘केदार नंदा‘, ‘ला दे बिरा माने चुनरी‘, या केदार रागातील संवादात्मक असलेल्या बंदिशींद्वारे देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे वेगळेपण रसिकांसमोर सादरीकरणातून प्रस्तुत केले. चैत्रातील निसर्गाचे दर्शन घडविणारी ‌‘मालकंस‘मधील ‌‘सब भये सोहर‘ ही रचना सादर केल्यानंतर ‌‘धन बसंती‘, ‌‘दीप की ज्योत जले‘ तसेच ‌‘म्हारुजी भुलोनो माने‘ या रचना सादर केल्या. पंडित कुमार गंधर्व यांची गायकी कशी होती, रागांबद्दल त्यांचे काय विचार होते या विषयी राहुल देशपांडे यांनी विवेचन करत गायन प्रस्तुतीतून रसिकांना अचंबित केले. निसर्गाचे वर्णन करणाऱ्या, सणांची महती सांगणाऱ्या रचनाही त्यांनी ऐकविल्या. भैरवीतील टप्पा आणि निर्गुणी भजन सादर करून राहुल देशपांडे यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना चैतन्य कुंटे (हार्मोनियम) आणि निखिल फाटक (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना चैतन्य कुंटे यांची होती. रसिकांशी संवाद साधताना राहुल देशपांडे म्हणाले, कुमारजींच्या प्रत्येक बंदिशीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जे मांडायचे ते मोजक्या शब्दात मांडत. त्या व्यतिरिक्त काही मांडायचे असल्यास ते दुसऱ्या बंदिशीची रचना करत. कुमारजींच्या बंदिशी जशा लिहिलेल्या आहेत त्या तशाच्या तशा गाण्यात मजा आहे, कारण कुमारजींची प्रत्येक मात्रा बांधलेली आहे, त्यामुळे त्यात छेडखानी करणे शोभून दिसत नाही. कुमारजींचे गायन ऐकून भारावून गेल्याने आपण संगीत क्षेत्राकडे ओढले गेलो असल्याचा राहुल यांनी आवर्जून उल्लेख केला. मैफलीच्या आयोजनाविषयी माहिती देताना प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, आम्ही ज्या कलाकारांना पाहिले आणि ज्यांनी आम्हाला घडविले अशा थोर कलाकारांपैकी एक म्हणजे पंडित कुमार गंधर्व होय. ते संत होते, त्यांचे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य होते. त्यांच्याकडे मी प्रत्यक्ष शिकलो नसलो तरी हे थोर कलाकार माझे परात्पर गुरूच आहेत. त्यांचे आशीर्वाद मला लाभले, त्यांचा परिसस्पर्श झाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‌‘कुमार रागविलास‘ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.  पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भविष्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे.

Read More
ENTERTAINMENTLatest News

अमृता खानविलकरचे पहिलंवहिलं गाणं ‘गणराज गजानन’ भाविकांच्या भेटीला

आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने आणि नृत्य अदाकारीने सर्वांना घायाळ घालणाऱ्या अमृता खानविलकरने गणेशोत्सवानिमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी एक भेट आणली आहे. अमृतकला स्टुडिओज

Read More
Latest NewsPUNE

राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन आणि उस्ताद शाहिद परवेझ यांच्या सतारीच्या झंकाराने तीन दिवसीय ‘स्वरमल्हार’ महोत्सवाची सांगता

पुणे  : पावसाची संततधार, राग मल्हारची अनुभूती आणि मन व्याकूळ करणारे सतारीचे झंकार अशा वातावरणात आठव्या तीन दिवसीय ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचा आज

Read More
ENTERTAINMENTLatest News

JioCinema : मी वसंतरावने होणार मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरूवात

जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी चित्रपट ‘मी वसंतराव’ लवकरच डिजिटल माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या वर्षी अनेक फिल्म महोत्सव तसेच

Read More
Latest NewsPUNE

शास्त्रीय गायनासह मराठी रचनांनी सजली ‘सुश्राव्य साधना’

पुणे : पुरिया धनाश्री रागातील पायलिया झनकार मोरी… रचनेने झालेली सुरुवात, त्यापाठोपाठ पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेली बिंदिया ले गयी

Read More
Latest NewsPUNE

मधुश्री भट्टाचार्य यांच्या सुरेल गायकीने वसंतोत्सवच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात

पुणे : हिंदी चित्रपटसृष्टीतील एकाहून एक सरस गीते ‘व्हॉईस ऑफ ए आर रेहमान’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या मधुश्री भट्टाचार्य यांच्या

Read More
Latest NewsPUNE

कौशिकी चक्रबर्ती आणि राहुल देशपांडे यांच्या सहगायनाने रंगला ‘वसंतोत्सव’चा पहिला दिवस

पुणे : पटियाला घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रबर्ती आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध शास्त्रीय राहुल देशपांडे यांच्या दमदार सहगायनाने ‘वसंतोत्सव’चा

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

कौशिकी चक्रबर्ती यांच्या गायनाने १६ व्या ‘वसंतोत्सव’ची बहारदार सुरुवात

पुणे  : पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे

Read More
Latest NewsPUNE

काळानुरूप कलाकारालाही बदलावेच लागते – कौशिकी चक्रवर्ती

पुणे  : “कलाकार हा कलेचा प्रचार करणारा प्रवक्ता असतो. आपण ज्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत राहतो, ती नेहमीच बदलत असते. त्यामुळे कलाकाराही

Read More
Latest NewsPUNE

वसंतोत्सव २०२३ पुरस्कार शुभदा पराडकर, डॉ. शुभदा कुलकर्णी व कार्तिकस्वामी दहिफळे यांना जाहीर

पुणे : ‘वसंतोत्सव’ संगीत महोत्सवांतर्गत दिला जाणारा ‘वसंतोत्सव पुरस्कार’ यंदा ग्वाल्हेर-आग्रा परंपरेतील ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी शुभदा पराडकर, संगीत संशोधिका

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

‘मी वसंतराव’ चित्रपटाचा ऑस्करच्या रिमाइंडर लिस्टमध्ये समावेश

वेगळ्या प्रयोगाला दाद मिळत असल्याचा आनंद; राहुल देशपांडे द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच ९५ व्या

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

स्वर झंकार संगीत महोत्सवात रसिकांना शास्त्रीय संगीताची अनुभूती

पुणे  : ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. मीता पंडित यांचे सुरेल गायन, दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांचे पुत्र व शिष्य राहुल

Read More
Latest NewsPUNETOP NEWS

२० ते २२ जानेवारी दरम्यान रंगणार १६ वा ‘वसंतोत्सव’

पुणे : पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे

Read More
Latest NewsPUNE

देशाचे भविष्य घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे – डॉ. शां.ब. मुजुमदार

पुणे  : “ शालेय शिक्षण हे अत्यंत महत्वाचे असते. कारण याच माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडत असते. त्यांच्यामधील कौशल्य, कला आणि

Read More
ENTERTAINMENTLatest NewsNATIONALTOP NEWS

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान नवी दिल्ली  : ‘गोष्ट एका पैठणीची’ या

Read More
Latest NewsPUNE

Pune Festival – गुलाल…..अबीर उधळत रंगली राहुल देशपांडेची संगीत मैफल

पुणे : गुलाल हा गणपतीला प्रिय तर विठ्ठलाला पांडुरंगाला अबीर…..गणेशापासून सुरू झालेली सूरांची मैफल अखेर कानडा राजा विठ्ठलापर्यंत येऊन थांबली.

Read More
Latest NewsPUNE

शास्त्रीय गायक राहुल देशपांडे कुटुंबीयांसोबत झाले ‘रंगवा तुमचा कागदी बाप्पा’ उपक्रमात सहभागी 

पुणे : पुणे हँडमेड पेपर्स, आर्ट पुणे फाऊंडेशन आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगवा तुमचा कागदी बाप्पा’ हा इको-फ्रेंडली

Read More
ENTERTAINMENTLatest NewsPUNE

चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले – राहुल देशपांडे

चित्रपटनिर्मितीच्या प्रवासात खूप काही शिकायला मिळाले – राहुल देशपांडे

Read More
Latest NewsPUNE

स्वर-सूरांच्या मैफिलीत पुणेकर मंत्रमुग्ध

पुणे : राजस आणि तेजस या उपाध्ये बंधूनी सादर केलेली व्हायोलिन जुगलबंदी, गायक राहुल देशपांडे यांचे बहारदार गायन आणि उत्तरोत्तर

Read More
Latest NewsPUNE

आता युरोपातही रंगणार वसंतोत्सव

प्रथमच विदेशात आयोजन, चार शहरांमधील रसिकांना मिळणार शास्रीय संगीताची पर्वणी पुणे : शास्रीय गायनाच्या माध्यमातून पुणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा गायक

Read More
%d bloggers like this: