fbpx
Tuesday, September 26, 2023

पंडित कुमार गंधर्व

Latest NewsPUNE

राहुल देशपांडे यांच्या सादरीकरणातून घडले पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन

पुणे : युगप्रवर्तक, विख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन पुणेकर रसिकांना घडले. निमित्त होते स्वरझंकार व इंडेको प्रायमस यांच्या वतीने ‌‘कुमार रागविलास‘ या सांगीतिक मैफलीचे. पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. पंडित कुमार गंधर्व यांनी बांधलेल्या बंदिशींचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी रसिकांशी संवाद साधत केलेले सादरीकरण मैफलीचे वेगळेपण ठरले. राहुल देशपांडे यांनी मैफलीची सुरुवात राग श्रीने केली. ‌‘पावा मय दुरासे‘, ‌‘रिसई काहे‘ आणि ‌‘करन देरे कछुलला‘ या तीन बंदिशींचे सादरीकरण केले. त्यानंतर कल्याण रागातील बंदिशी सादर केल्या. ‌‘बैठी हुं अकेली‘, ‌‘केदार नंदा‘, ‘ला दे बिरा माने चुनरी‘, या केदार रागातील संवादात्मक असलेल्या बंदिशींद्वारे देशपांडे यांनी पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे वेगळेपण रसिकांसमोर सादरीकरणातून प्रस्तुत केले. चैत्रातील निसर्गाचे दर्शन घडविणारी ‌‘मालकंस‘मधील ‌‘सब भये सोहर‘ ही रचना सादर केल्यानंतर ‌‘धन बसंती‘, ‌‘दीप की ज्योत जले‘ तसेच ‌‘म्हारुजी भुलोनो माने‘ या रचना सादर केल्या. पंडित कुमार गंधर्व यांची गायकी कशी होती, रागांबद्दल त्यांचे काय विचार होते या विषयी राहुल देशपांडे यांनी विवेचन करत गायन प्रस्तुतीतून रसिकांना अचंबित केले. निसर्गाचे वर्णन करणाऱ्या, सणांची महती सांगणाऱ्या रचनाही त्यांनी ऐकविल्या. भैरवीतील टप्पा आणि निर्गुणी भजन सादर करून राहुल देशपांडे यांनी मैफलीची सांगता केली. त्यांना चैतन्य कुंटे (हार्मोनियम) आणि निखिल फाटक (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना चैतन्य कुंटे यांची होती. रसिकांशी संवाद साधताना राहुल देशपांडे म्हणाले, कुमारजींच्या प्रत्येक बंदिशीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना जे मांडायचे ते मोजक्या शब्दात मांडत. त्या व्यतिरिक्त काही मांडायचे असल्यास ते दुसऱ्या बंदिशीची रचना करत. कुमारजींच्या बंदिशी जशा लिहिलेल्या आहेत त्या तशाच्या तशा गाण्यात मजा आहे, कारण कुमारजींची प्रत्येक मात्रा बांधलेली आहे, त्यामुळे त्यात छेडखानी करणे शोभून दिसत नाही. कुमारजींचे गायन ऐकून भारावून गेल्याने आपण संगीत क्षेत्राकडे ओढले गेलो असल्याचा राहुल यांनी आवर्जून उल्लेख केला. मैफलीच्या आयोजनाविषयी माहिती देताना प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, आम्ही ज्या कलाकारांना पाहिले आणि ज्यांनी आम्हाला घडविले अशा थोर कलाकारांपैकी एक म्हणजे पंडित कुमार गंधर्व होय. ते संत होते, त्यांचे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य होते. त्यांच्याकडे मी प्रत्यक्ष शिकलो नसलो तरी हे थोर कलाकार माझे परात्पर गुरूच आहेत. त्यांचे आशीर्वाद मला लाभले, त्यांचा परिसस्पर्श झाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‌‘कुमार रागविलास‘ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.  पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भविष्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे.

Read More
Latest NewsPUNE

‌‘कालजयी’ कार्यक्रमाअंतर्गत शब्द-चित्रातून उलगडले  पंडित कुमार गंधर्व

पुणे : लोकसंगीतातील धूनउगम रागांवर पंडित कुमारजींनी पितृतुल्य प्रेम केले. संगीतातील सादरीकरण करताना ते समयचक्राविषयी, सिद्ध आणि शुद्ध राग सादर करण्याविषयी आग्रही होते. त्यांना अमूर्ततेचे आकर्षण होते. पंडितजी कलाकार म्हणून युगपुरुष होते; परंतु व्यक्ती म्हणून अतिशय साधे–भाबडे पण शब्दाला पक्के होते, अशा भावना युगप्रवर्तक, विख्यात हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या सुहृदांनी व्यक्त केल्या. कुमार गंधर्व यांची गायकी दृक–श्राव्य चित्रफितीतून अनुभवायला मिळाल्याने उपस्थित भावूक झाले. कार्यक्रमास संगीत–कला क्षेत्रातील दिग्गज कलाकार उपस्थित होते. कुमार गंधर्व प्रतिष्ठानतर्फे ‌‘कालजयी‘ कार्यक्रमाअंतर्गत रविवारी सायंकाळी नॅशलन फिल्म अर्काइव्ह येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात शास्त्रीय गायिका अलका देव–मारुलकर, युवा संगीतकार सृजन देशपांडे, चित्रकार आणि संगीतप्रेमी जयंत भीमसेन जोशी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश  मुकुल मुद्गल,  लेखक सोपान जोशी,  लेखिका माधुरी पुरंदरे यांचा सहभाग होता. त्यांच्याशी रेखा इनामदार–साने यांनी संवाद साधला. अलका देव – मारुलकर म्हणाल्या, कुमारजींची कलंदर वृत्ती त्यांच्या गायनातूनही दिसून येत असे. प्रत्येक रागात सगळे स्वर लागतात ही मोठी शिकवण त्यांच्याकडून मला मिळाली. गायनामध्ये गायकाचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबीत होणे ही दिव्य घटना आहे असे ते मानत. गायकाने आवाज घडविण्याची गरज नाही कारण त्यात मूळ आवाज हरवून जातो. गरज नसलेल्या रागांमध्ये खर्जाचा वापर करू नये, नवराग–जोडरागांची निर्मिती सारासार विचार करून करावी या विषयी त्यांची स्पष्ट मते होती. जयंत भीमसेन जोशी म्हणाले, कुमारजी फार रितीचे होते. त्यांच्यात तेज–अभिरुची–चपलता होती. ते आनंदाचा अर्कहोते. गायनातून त्यांनी स्वत: आनंद घेतल्यामुळे ते रसिकांनाही आनंद देत असत. कमीत कमी सूरांमध्ये अचूकतेने रागाचे विश्व उभे कराण्याची जादू कुमारजींकडे होती. कुमारजी आध्यत्मिकदृष्ट्या वेगळ्या पातळीवर होते. कुमारजी छोट्या–छोट्या गोष्टीतून आनंद घेत असल्याचे सांगून मुकुल मुद्गल म्हणाले, निसर्ग, पशु–पक्षी यांची त्यांना आवड होती. अचूकता आणि दिलेला शब्द आणि वेळ पाळणे ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. खाणे आणि खिलविणे याची त्यांना विशेष आवड होती. कुमार गंधर्व यांच्याविषयीच्या ‌‘कुमारस्वर एक गंधर्व कथा‘ या पुस्तकाची निर्मिती कशी झाली याचे विवेचन करून माधुरी पुरंदरे म्हणाल्या, माझा व कुमारजींचा परिचय नव्हता. त्यांना मी मैफलीतच पाहिले होते. हे पुस्तक किशोरवयीन मुलांसाठी लिहायचे आहे हा विचार मनात ठेवून कुमार गंधर्वांची साधी–सरळ गोष्ट सांगावी अशा विचाराने मी लिहिती झाले. या पुस्तक निर्मितीतील कालावधीत मी कुमार गंधर्वमय होऊन आनंद उपभोगला. सोपान जोशी यांनीही कुमार गंधर्व यांच्याविषयी ‌‘शिवपुत्र कथा‘ हे हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले असून त्या विषयी बोलताना ते म्हणाले, आजच्या पिढीला जीवन कसे जगता येते हे कळले पाहिजे या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्याचे ध्येय मनात ठरवले होते. विख्यात व्यक्ती बालकाप्रमाणे जगू शकते, आनंद घेऊ शकते, सहज असते हे आजच्या काळात पहायला मिळणे अवघड आहे. त्यामुळे मोठेपण सहजतेने कसे निभावता येते याचे उदाहरण या पुस्तकातून वाचकांपर्यंत नक्की पोहोचेल. पंडित कुमार गंधर्व समकालीन गायकांमध्ये वेगळे का वाटतात याचे सखोल चिंतन करत सृजन देशपांडे यांनी दृक–श्राव्य माध्यमातून पंडितजींचे सांगीतिक जीवन रसिक श्रोत्यांपुढे उलगडले. परिसंवादात सहभागी मान्यवरांचे स्वागत कलापिनी कोमकली आणि भुवनेश कोमकली यांनी केले.

Read More
Latest NewsPUNE

कलापिनी कोमकली यांच्या सादरीकरणातून पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचे दर्शन

पुणे : मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर याचे सुरेल गायन… ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांच्या गायनातून

Read More
Latest NewsPUNE

पं. कुमार गंधर्व यांचे गायन मनाला प्रफुल्लीत करणारे – उल्हास पवार

पुणे ः पं. कुमार गंधर्व यांच्या गायकीमध्ये असणारा भक्तीरस मनाला भावणारा आहे. त्यांची गायकी मनाची प्रसन्नता निर्माण करणारी आहे. अगदी

Read More
Latest NewsPUNE

‘शब्द-गान’ सांगीतिक मैफलीतून उलगडली गायकीतील सूक्ष्म सौंदर्यस्थळे

पुणे : गानतपस्वीनी मोगुबाई कुर्डिकर, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे यांच्यासह अनेक ख्यातकीर्त गायकांच्या गायकीतील तसेच उत्तर भारतीय अभिजात

Read More
%d bloggers like this: