अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत
नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेत अश्विनी कासार पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अश्विनी या मालिकेत साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. अश्विनी पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसते आहे. याआधी निरनिराळ्या मालिकांमधून आणि निरनिराळ्या व्यक्तिरेखांमधून अश्विनी कासार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ह्या मालिकेची झलक सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेची टीम या मालिकेसाठीच कार्यरत आहे. हरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी यांच्या
Read more