Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली ‘आयसीएमएआय’ पुणेचे अध्यक्ष

 

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या पुणे चॅप्टरच्या २०२५-२६ या कार्यकाळासाठी पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. सीएमए श्रीकांत इप्पलपल्ली यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सीएमए राहुल चिंचोळकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सीएमए हिमांशू दवे यांची सचिव म्हणून तर सीएमए तनुजा मंत्रवादी यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.

मावळते अध्यक्ष सीएमए निलेश केकाण यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीएमए निलेश केकाण, सीएमए नागेश भागणे, सीएमए अमेय टिकले, सीएमए अनुजा दाभाडे आणि सीएमए निखिल अग्रवाल हे काम पाहतील. कर्वेनगर येथील सीएमए भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नवनियुक्त अध्यक्ष श्रीकांत इप्पलपल्ली म्हणाले, मागील २० वर्षांपासून मी या क्षेत्रात कार्यरत असून ‘आयसीएमएआय’ पुणे मध्ये ६ वर्षांपासून आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढविणे, सभासदांसाठी काही वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांच्या ज्ञानात कशा प्रकारे भर घालता येईल, याकरिता विशेष प्रयत्न करणार आहोत. पुणे चॅप्टरचे नाव आजपर्यंत ज्या उंचीवर पोहोचले आहे, त्यामध्ये भर घालत ते अधिक उंचीवर नेण्याचा आम्ही प्रयत्न करू. ज्येष्ठ सदस्य सीएमए डॉ. डी.व्ही. जोशी, सीएमए डॉ. संजय भार्गवे, सीएमए अमित आपटे, सीएमए नीरज जोशी, सीएमए चैतन्य मोहरीर, सीएमए डॉ. एन. के. निमकर यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांचे व सर्व सभासदांचे आभार इप्पलपल्ली यांनी मानले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत.सन १९६५ साली पुण्यात स्थापन झालेल्या या विभागाने आजवर ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले असून २२०० हून अधिक विद्यार्थी प्रमाणित कॉस्ट अकाउंटंट्स म्हणून घडवले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading