fbpx
Thursday, December 7, 2023
Latest NewsPUNE

निराधार आजी-आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवा

पुणे : दिवाळी हा संपूर्ण कुटुंबाचा सण. पूर्वी वाडयांमध्ये एकत्रितपणे दिवाळी साजरी होत असे. मात्र, आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबा या सणापासून काहीसे वंचित असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आजी-आजोबांना देखील दिवाळीचा आनंद मिळावा आणि सामान्यांनी दिवाळीचा पहिला दिवा आजी-आजोबांसोबत प्रज्वलित करावा, याकरिता पुण्यामध्ये आजी-आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवा हा अनोखा कार्यक्रम पार पडला.

प्रल्हाद गवळी मित्र परिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेवा पुणे शहर तर्फे रविवार पेठेतील लोणार आळी महाजन वाडी येथे आजी-आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, मनसे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, शिरीष मोहिते, डॉ. मिलींद भोई, गोपाळ पायगुडे, विवेक खटावकर, उद्योजक आप्पासाहेब अष्टेकर, निलिमा रासने, सुनिता जोशी, कल्याणी सराफ, विजय नलावडे, भाई कात्रे, आयोजक प्रल्हाद गवळी आदी उपस्थित होते.

प्रल्हाद गवळी म्हणाले, दिवाळीच्या निमित्ताने निराधार आजी-आजोबांसोबत दिवाळीचा पहिला दिवा हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबवित आहोत. उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. निराधार आजी-आजोबांचा सन्मान करण्यासोबतच त्यांना वस्त्र, फराळ, आकाशकंदील व दिवाळी साहित्य देखील देण्यात आले. दिवाळीचा आनंद या ज्येष्ठ नागरिकांना देखील मिळावा. तसेच समाजाशी त्यांची नाळ पुन्हा एकदा जोडली जावी, याउद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. संदीप ढवळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d