fbpx
Thursday, December 7, 2023
ENTERTAINMENTLatest News

अक्षराला,अधिपतीकडून पाडव्याची विलक्षण भेट !

नव्या जोडप्याला लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीची जितकी उत्सुकता असते तितकीच आवर्जून प्रतीक्षा असते दिवाळीतल्या पाडव्याची. झी मराठीवर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ह्या मालिकेत ही अक्षरा- अधिपतीची पहिली दिवाळी आहे आणि अक्षरा ही दिवाळी खास बनविण्या करिता स्वतः आकाश कंदील बनवतेय, जो पाहून अधिपती तिच्या पुन्हा प्रेमात पडतो. अक्षराने बनवलेला आकाश कंदील अधिपती कौतुकाने घरासमोर लावतो. भुवनेश्वरी तो कंदील पाहते आणि अधिपती कडे हट्ट धरते, की तिने आणलेला आणि सूर्यवंशींच्या श्रीमंतीला शोभेल असाच आकाश कंदील घरासमोर लागला पाहिजे. आता अधिपती, आईचा हट्ट पुरवणार की बायकोच मन सांभाळणार? अक्षराचा लग्नानंतरचा हा पहिलाच पाडवा आहे त्यामुळे मास्तरीणबाईंना काहीतरी खास द्यायचं म्हणून अधिपती देणार आहे अशी एक वस्तू ज्यामुळे मास्तरीणबाईंचा चेहरा आनंदानी फुलून जाणार आहे. काय होईल जेव्हा भुवनेश्वरीला कळेल अधिपतीच्या ह्या दिवाळी भेटीबद्दल? त्यासाठी पाहायला विसरू नका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ दिवाळी विशेष भाग सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. आपल्या झी मराठी वाहिनीवर.

Leave a Reply

%d