Wednesday, June 10, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रवादी पर्वती विधानसभा मतदारसंघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर

 

पुणे: राष्ट्रवादी पर्वती विधानसभा मतदारसंघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर शहराध्यक्ष दिपक मानकर, कार्याध्यक्ष  प्रदिप देशमुख,  प्रिया गदादे, युवकाध्यक्ष समीर चांदेरे यांच्या हस्ते सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधासभा प्रभाग अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव नेमुन त्यांना पदनियुक्ती देण्यात आली.

समाजहितासाठी काम करा, आपला पक्ष हा प्रत्येक घटकापर्यंत पोचवा व त्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तसेच अजितदादा पवार यांच्या विचाराच्या व लोकहिताची कामे करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल अशी ग्वाही शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर व प्रदीप दादा देशमुख यांनी दिली.

यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री संतोषभाऊ नांगरे, प्रदेश प्रतिनिधी  शिवाजीभाऊ गदादे, विधानसभा कार्याध्यक्ष विपुल म्हैसुरकर, कार्याध्यक्ष रामदास गाडे, सेवादलाच्या अध्यक्षा सौ.शशिकलाताई कुंभार, सामाजिक सेल अध्यक्ष श्री.जयदेव इसवे, ओ.बी.सी सेल कार्याध्यक्ष  रूपेश आखाडे आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading